TRENDING:

IND vs SA टेस्ट मॅच आधी ICCचा मोठा निर्णय, WTCमध्ये होणार बदल; आयसीसीच्या बैठकीत काय ठरले?

Last Updated:

IND vs SA WTC: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) पुढील चक्रात आयसीसी सर्व १२ पूर्ण सदस्य देशांना एकाच डिव्हिजनमध्ये समाविष्ट करण्याची तयारी करत आहे. छोट्या देशांच्या विरोधामुळे 'टू-टियर' मॉडेल रद्द करण्यात आले असून, 2027 पासून अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि आयर्लंडचाही लीगमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

नवी दिल्ली: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 14 नोव्हेंबरपासून सुरू होत असतानाच, आयसीसी (ICC) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेबाबत (WTC) एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

आयसीसी पुढील WTC चक्रात (Cycle) सर्व 12 पूर्ण सदस्य देशांना (Full Member Nations) एकाच डिव्हिजनमध्ये (Division) समाविष्ट करू शकते. यापूर्वी WTC साठी 'टू-टियर' (Two-Tier) प्रणालीची योजना आखण्यात आली होती, परंतु अनेक देशांनी या योजनेला पाठिंबा न दिल्याने आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान आयसीसी पुन्हा एकदा वनडे सुपर लीग (One-Day Super League) सुरू करण्याची योजना आखत आहे.

advertisement

न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू रॉजर ट्वेस यांच्या नेतृत्वाखालील एका कार्यकारी गटाला (Working Group) क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटशी संबंधित काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम सोपवण्यात आले होते. या कार्यकारी गटाने आयसीसीच्या बैठकीत WTC च्या टू-टियर आणि वनडे सुपर लीग योजनेवर आपला अहवाल सादर केला. या अहवालानुसार पुढील सत्रात WTC मध्ये 12 संघ असावेत असा निर्णय घेण्यात आला. टू-टियर प्रणालीवर एका दशकाहून अधिक काळ चर्चा सुरू होती आणि जुलैमध्ये आयसीसीच्या वार्षिक बैठकीत जेव्हा या कार्यकारी गटाची स्थापना झाली, तेव्हाही हा चर्चेचा एक विषय होता.

advertisement

आयसीसीच्या टू-टियर मॉडेलला छोट्या देशांनी विरोध दर्शवला. वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि पाकिस्तानसारख्या देशांना, ज्यांच्या डिव्हिजन दोनमध्ये जाण्याची शक्यता होती, त्यांनी या मॉडेलला विरोध केला. याचे कारण असे होते की, टू-टियर प्रणालीमुळे या संघांना मोठ्या संघांसोबत खेळण्याची संधी कमी मिळाली असती. याशिवाय जागतिक क्रिकेटमधील 'बिग थ्री' (Big Three) म्हणून ओळखले जाणारे भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांना टू-टियर प्रणालीमुळे अधिक आर्थिक लाभ झाला असता, कारण हे संघ आपापसात जास्तीत जास्त सामने खेळले असते, ज्यामुळे व्ह्यूअरशिप आणि ब्रॉडकास्टिंगद्वारे जास्त कमाई झाली असती. छोट्या संघांसोबत कसोटी खेळल्यास या गोष्टींमध्ये नुकसान होण्याची शक्यता होती.

advertisement

या विरोधामुळेच कार्यकारी गटाने आता 12 संघांचे WTC प्रस्तावित केले आहे. जुलै 2027 मध्ये सुरू होणाऱ्या पुढील चक्रात अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि आयर्लंड हे देश देखील विस्तारित लीगचा भाग असू शकतात. या चक्रादरम्यान संघांकडून किमान निर्धारित कसोटी सामने खेळण्याची अपेक्षा आयसीसी ठेवेल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यातील खरटमल कुटुंबाचा अनोखा छंद, जुन्या ग्रामोफोनचा केला संग्रह,काय आहे खास?
सर्व पहा

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA टेस्ट मॅच आधी ICCचा मोठा निर्णय, WTCमध्ये होणार बदल; आयसीसीच्या बैठकीत काय ठरले?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल