काय म्हणाला शुभमन गिल?
आम्ही प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या दिवशी खेळपट्टी बॅटिंगसाठी चांगली दिसत आहे. आमच्यासाठी सातत्य राखणे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक मॅचमध्ये त्याच तीव्रतेने खेळ करणे आणि चांगला परफॉर्मन्स सातत्याने देणे हे आमच्या टीममध्ये नेहमीच बोलले जाते आणि या कसोटी क्रिकेटमध्ये देखील आम्ही हेच लक्ष्य ठेवले आहे. खरे सांगायचे तर, माझ्यात फारसा बदल झालेला नाही. मी अजूनही तोच माणूस आहे, पण नक्कीच आता माझ्यावर अधिक जबाबदाऱ्या आहेत. परंतु, मला जबाबदाऱ्या आवडतात आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये माझी भूमिका वाढल्यामुळे माझे भविष्य खूप उत्सुक आहे. या कसोटी मॅचसाठी आमच्या टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही, आम्ही सेम टीमसोबत मैदानात उतरलो आहोत.
advertisement
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (C), ध्रुव जुरेल (WK), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): जॉन कॅम्पबेल, टॅगेनारिन चंद्रपॉल, ॲलिक अथानाझे, शाई होप, रोस्टन चेस (C), टेविन इम्लाच (WK), जस्टिन ग्रीव्हस, जोमेल वॅरिकन, खारी पियरे, अँडरसन फिलिप, जेडेन सील्स.