TRENDING:

VIDEO : दीडशे ठोकताच जयस्वालला ॲटीट्यूड, भर मैदानात कर्णधारालाच विचारतो, 'ये कितने फिंगर है', नेमकं काय घडलं?

Last Updated:

सामन्या दरम्यान मैदानात यशस्वी जयस्वालने शुभमन गिलला 'ये कितने फिंगर है' असा सवाल केला आहे.त्यामुळे मैदानात नेमकं काय घडलं? हे जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ind vs wi 2nd test
ind vs wi 2nd test
advertisement

India vs West Indies : वेस्ट इंडिज विरूद्ध सूरू असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात एक विचित्रच घटना घडली आहे. या सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल उत्कृष्ट फलंदाजी करतो आहे. आज सामन्याच्या पहिल्या दिवशी जयस्वाल 173 धावांवर नाबाद राहिला होता. या सामन्या दरम्यान मैदानात यशस्वी जयस्वालने शुभमन गिलला 'ये कितने फिंगर है' असा सवाल केला आहे.त्यामुळे मैदानात नेमकं काय घडलं? हे जाणून घेऊयात.

advertisement

खरं तर स्ट्राईकवर असताना यशस्वी जयस्वालने बॉल जोरात फ्लिक केला होता. पण मिड विकेटवर वेस्ट इंडिजच्या खेळाडूने उत्कृष्ट फिल्डींग केली. या दरम्यान जयस्वाल आणि गिलने एक सिंगल चोरण्यात प्रयत्न केला. यावेळी थ्रो किपरकडे आला होता. पण तो लक्ष्यापासून खूप दूर होता आणि तो टाळण्याचा प्रयत्न करत असताना, गिलची टेविन इमलाचशी टक्कर झाली होती.

advertisement

या टक्करनंतर लगेचच, गिलने त्याचे हेल्मेट काढले आणि तो काही सेकंद अस्वस्थ दिसत होता. या दरम्यान जयस्वालने त्याच्या जवळ जाऊन दोन बोट दाखवली आणि विचारले 'ये कितने नंबर है'!. सूरूवातीला गिलचे डोळे फिरले त्यानंतर त्याने एकटक पाहायलं आणि नंतर हसत सुटला. एकंदरीत जयस्वालने गिलची स्थिती तपासण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मेडिकल टीम देखील मैदानात आली होती. त्यानंतर गिलला बरं वाटत असल्याने खेळ सूरूच ठेवला होता.

advertisement

पहिल्याच दिवशी 300 पार

वेस्ट इंडिज विरूद्ध दुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाने चांगली सूरूवात केली होती. टीम इंडियाकडून केएल राहुलने 38 धावा ठोकल्या आहेत.तर साई सुदर्शनच शतकं हुकलं आहे.सुदर्शन 87 धावा करून बाद झाला आहे. तर टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल 173 धावांवर नाबाद खेळतो आहे. त्याच्या जोडीला क्रिजवर शुभमन गिल 20 धावांवर खेळतो आहे. या धावांच्या बळावर टीम इंडियाने पहिल्या दिवसअखेर 2 विकेट गमावून 318 धावा ठोकल्या आहेत. आता टीम इंडियाच्या हातात अजून 8 विकेट आहेत. त्यामुळे टीम इंडियाने पहिल्या डावात आणखी खूप धावा जोडता येणार आहे.या धावांच्या बळावर टीम इंडिया वेस्ट इंडिजला सहज पराभूत करू शकेल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
घरासारखी चव आणि किंमतही कमी, दिवाळीचा फराळ ठाण्यात इथं सगळ्यात स्वस्त
सर्व पहा

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : दीडशे ठोकताच जयस्वालला ॲटीट्यूड, भर मैदानात कर्णधारालाच विचारतो, 'ये कितने फिंगर है', नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल