TRENDING:

IND W vs AUS W : थर्ड अंपायरच्या निर्णयावरून वाद, क्लियर Out असताना धडधडीत Not Out दिलं, पाहा Video

Last Updated:

Phoebe Litchfield LBW Controversy : इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया वुमेन्स सामन्यात अंपायरच्या एका निर्णयाने चांगला वाद उद्भवला आहे. ऑस्ट्रेलियाची फलंदाज फोबी लिचफील्ड हिला आऊट असताना देखील नॉट आऊट दिलं गेलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India Womens vs Australia Womens : आयसीसी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात निर्णायक सामना खेळवला जातोय. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना असल्याने दोन्ही संघ जोर लावताना दिसतायेत. मात्र, या सामन्यात अंपायरच्या एका निर्णयाने चांगला वाद उद्भवला आहे. ऑस्ट्रेलियाची फलंदाज फोबी लिचफील्ड हिला आऊट असताना देखील नॉट आऊट दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Phoebe Litchfield LBW Controversy
Phoebe Litchfield LBW Controversy
advertisement

नेमकं काय झालं?

ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू असताना टीम इंडियाच्या गोलंदाजांना बॅटर्सचा सुर आवळला. 16 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाने 115 धावा केल्या होत्या. मात्र, 17 व्या ओव्हरमध्ये एक घटना घडली. 17 वी ओव्हर स्टार स्पिनर दिप्ती शर्मा घेऊन आली. त्यावेळी पहिल्याच बॉलवर फोबी लिचफील्डने दिप्तीला फोर मारला. मात्र, दुसऱ्या बॉलवर फोबी लिचफील्ड अडकली. दुसरा बॉल तिने स्वीट हिट मारण्याचा प्रयत्न केला. त्यावर ऑनफिल्ड अंपायरने आऊट दिलं. टीम इंडियाने जल्लोष केला खरा पण ऑस्ट्रेलियाने रिव्ह्यू मागितला.

advertisement

ऑस्ट्रेलियाने रिव्ह्यू मागितल्यानंतर थर्ड अंपायरने बॉल पिचिंग आऊटसाईड लेग असल्याचं दाखवलं गेलं. डावखुऱ्या फोबी लिचफील्डने स्वीच हिट मारताना कूस बदलली. मात्र, अंपायरने तरी देखील आऊटसाईड लेग असल्याचं जाहीर केलं अन् फोबी लिचफील्डला नॉट आऊट जाहीर केलं. एलबीडब्ल्यूच्या अपीलसाठी बॉलची पिचिंग आऊटसाईड ऑफ असणं गरजेचं असतं. मात्र, स्विच हीटच्या प्रयत्न केल्याने थर्ड अंपायरने निर्णय बदलला.

advertisement

advertisement

दरम्यान, थर्ड अंपायरच्या निर्णयावर स्मृती मानधना चांगलीच भडकली. तिने अंपायरकडे याची तक्रार देखील केली. मात्र, अखेर फोबी लिचफील्डला नॉट आऊट दिलं गेलं. अशातच थर्ड अंपायरचा निर्णय किती योग्य? असा सवाल विचारला जातोय.

ऑस्ट्रेलिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : ताहिला मॅकग्रा (कॅप्टन), बेथ मूनी (विकेटकीपर), ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफील्ड, जॉर्जिया वेरेहॅम, ॲनाबेल सदरलँड, सोफी मोलिनक्स, मेगन शुट आणि डार्सी ब्राउन.

advertisement

टीम इंडिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, श्रेयांका पाटील, आशा शोभना आणि रेणुका ठाकूर सिंग.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND W vs AUS W : थर्ड अंपायरच्या निर्णयावरून वाद, क्लियर Out असताना धडधडीत Not Out दिलं, पाहा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल