आशिया कपसाठी टीम इंडिया
सूर्यकुमार यादव (Captain), शुभमन गिल (VC), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, वरूण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग.
प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग, ध्रुव जुरेल आणि यशस्वी जयस्वाल यांना स्टँडबाय खेळाडू म्हणून तयार राहण्यास सांगितलं आहे.
advertisement
टीम इंडिया सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळेल. तर शुभमन गिलवर व्हाईस कॅप्टन्सीची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे शुभमन गिल प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल. त्यामुळे संजू सॅमसनची प्लेइंग इलेव्हनमधून हकालपट्टी निश्चित दिसतीये. तर ऑलराऊंडर म्हणून शिवम दुबेला संधी मिळेल की नाही? यावर शंका आहे. त्याचबरोबर अर्शदीप सिंगसोबत जसप्रीत बुमराह आशिया कप खेळणार आहे. वरूण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव या दोन फिरकीपटूंची जादू पहायला मिळू शकते.
दरम्यान, आशिया कपचा 17 वा हंगाम येत्या 9 सप्टेंबरपासून (Asia cup 2025 Schedule) सुरू होईल. भारतीय संघ 10 सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध स्पर्धेत आपला पहिला सामना खेळेल. त्यानंतर पाकिस्तानविरुद्धचा 14 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये सामना खेळवला जाणार आहे. भारताचा शेवटचा गट फेरीचा सामना 19 सप्टेंबर रोजी अबूधाबीमध्ये ओमानविरुद्ध होईल. त्यानंतर फायनल सामना 28 सप्टेंबर रोजी खेळवला जाईल.