पाकिस्तानसाठी 111 धावांचं आव्हान खूप सोपं होतं. मात्र, सेमीफायनल गाठण्यासाठी पाकिस्तानला 10.4 ओव्हरमध्ये आव्हान पूर्ण करायचं होतं. त्यासाठी पाकिस्तानने आक्रमक फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा पण न्यूझीलंडने बॅटर्सला मैदानात पाय ठेऊ दिला नाही. फक्त 28 धावांवर पाकिस्तानचा निम्मा संघ तंबूत परतला होता. मात्र, कॅप्टन फातिमा सना एकटी मैदानात उभा राहिली. मात्र, पाकिस्तानला केवळ 56 धावाच करता आल्या. न्यूझीलंडने 54 धावांनी विजय मिळवला.
advertisement
न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, न्यूझीलंडला चांगली सुरुवात मिळून देखील मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सुझी बेट्स आणि जॉर्जिया प्लिमर यांनी पावरप्लेमध्ये चोप दिला पण पाकिस्तानने मजबूत कमबॅक केलं. नशरा संधूने दोन्ही ओपनर्सला माघारी पाठवल्यानंतर न्यूझीलंडची टीम पत्त्यासारखी ठेपाळली. त्यानंतर ब्रुक हालिडे वगळता कोणतीही बॅटर मैदानात टिकली नाही. ब्रुक हालिडेने 22 धावांचं योगदान दिलं, त्यामुळे न्यूझीलंडला 20 ओव्हरमध्ये 110 धावा करता आल्या.
टीम इंडियासाठी होती संधी
जर पाकिस्तानने हा सामना जिंकला असता तर टीम इंडिया सेमीफायनलमध्ये गेली असती. पाकिस्तानसाठी विजय सोपा होता, त्यांना विजयासाठी केवळ 111 धावांची गरज होती. पाकिस्तानने हे आव्हान जर 10.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं असतं तर पाकिस्तानला देखील सेमीफायनल गाठण्याची संधी होती. मात्र, जर पाकिस्तानने सामना 10.4 ओव्हरनंतर जिंकला असता तर टीम इंडिया सेमीफायनलमध्ये गेली असती. मात्र, न्यूझीलंडने सहज विजय मिळवून सेमीफायनलचं तिकीट मिळवलं आहे.
आणखी वाचा - PAK vs NZ : लाईव्ह सामन्यात मोठी दुर्घटना, पाकिस्तानचे 2 फिल्डर धडकले, पाहा Video
पाकिस्तान महिला (प्लेइंग इलेव्हन): मुनीबा अली (विकेटकीपर), सिद्रा अमीन, सदफ शमास, निदा दार, ओमामा सोहेल, आलिया रियाझ, फातिमा सना (कर्णधार), इरम जावेद, सय्यदा आरूब शाह, नशरा संधू, सादिया इक्बाल.
न्यूझीलंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रुक हालिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास.