TRENDING:

IPL 2024 : आजपासून आयपीएलच्या रणसंग्रामाला सुरुवात, इथे फ्री मध्ये पाहता येतील सामने, असं आहे संपूर्ण वेळापत्रक

Last Updated:

देशातील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयकडून पहिल्या 21 सामन्यांचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मार्च महिना सुरू झाला की भारतासह जगभरातील क्रिकेटप्रेमींना इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेचे वेध लागतात. आयपीएलचा 17 वा सीझन 22 मार्च पासून सुरू होत आहे. गेल्या सीझनचे विजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यामध्ये चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर पहिली मॅच होणार आहे. देशातील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयकडून पहिल्या 21 सामन्यांचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
आयपीएल
आयपीएल
advertisement

आयपीएलची पहिली मॅच उदघाटन सोहळ्यानंतर रात्री आठ वाजता सुरु होणार आहे, मात्र त्यानंतरच्या संध्याकाळच्या मॅच साडेसात वाजता सुरु होतील तर ज्या दिवशी दोन मॅच असतील त्या दिवशी दुपारी साडेतीन वाजता एक आणि रात्री साडेसातला दुसरी मॅच सुरु होईल. उदघाटन सोहळ्यात अभिनेता अक्षय कुमार, टायगर श्रॉफ यांचे डान्स परफॉर्मन्स तर संगीतकार ए. आर. रहमान आणि गायक सोनू निगम यांचे कार्यक्रमही होणार आहेत. यंदा स्टार स्पोर्ट्सच्या विविध नेटवर्क्सवर आयपीएल मॅचेस पहता येतील. सगळ्या आयपीएल मॅच मोबाईलवर पाहण्यासाठी जिओ सिनेमा हे ॲप डाऊनलोड करावं लागेल. यंदा विजेत्या टीमला काय बक्षीस मिळणार हे मात्र अजून, गुलदस्त्यात ठेवण्यात आलेलं आहे.

advertisement

IPL 2024 : धोनीने का सोडलं कर्णधारपद? जडेजाला वगळून ऋतुराज गायकवाडलाच का दिली संधी?

आयपीएल सीझनमधील पहिली मॅच 22 मार्चला रात्री साडेसात वाजता सीएसके विरुद्ध आरसीबी यांच्यात चेन्नईमध्ये होईल.

23 मार्चला दुपारी साडेतीन वाजता मोहालीमध्ये पीबीकेएस विरुद्ध डीसी तर रात्री साडेसात वाजता केकेआर विरुद्ध एसआरएच यांच्यात कोलकात्यामध्ये मॅच होईल.

advertisement

24 मार्चला दुपारी साडेतीन वाजता जयपूरमध्ये आरआर विरुद्ध एलएसजी तर रात्री साडेसात वाजता जीटी विरुद्ध एमआय असा सामना अहमदाबादेत रंगणार आहे.

25 मार्चला रात्री साडेसात वाजता बेंगळुरूमध्ये आरसीबी आणि पीबीकेएस समोरासमोर उभे ठाकणार आहेत.

26 मार्चला रात्री साडेसात वाजता चेन्नईत सीएसके विरुद्ध जीटी तर 27 मार्चला रात्री साडेसात वाजता हैदराबादमध्ये एसआरएच विरुद्ध एमआय यांच्यातील क्रिकेट युद्ध रंगलेलं पहायला मिळेल.

advertisement

28 मार्चला रात्री साडेसात वाजता जयपूरमध्ये आरआर विरुद्ध डीसी यांच्यातील सामना खेळला जाईल. 29 मार्चला रात्री साडेसात वाजता बेंगळुरूमध्ये आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामना रंगेल.

30 मार्चला रात्री साडेसात वाजता लखनऊमध्ये एलएसजी आणि पीबीकेएस यांच्यातील सामना खेळवला जाईल.

31 मार्चला दुपारी साडेतीन वाजता अहमदाबादेत जीटी आणि एसआरएच तर रात्री साडेसात वाजता विशाखापट्टणममध्ये डीसी विरुद्ध सीएसके अशा लढती होतील.

advertisement

IPL 2024 : धोनी IPL 2024 चा पूर्ण सिझन खेळणार की नाही? CSK च्या कोचने दिली महत्वाची माहिती

1 एप्रिलला रात्री साडेसात वाजता मुंबईत एमआय विरुद्ध आरआर अशी मॅच होईल.

2 एप्रिलला रात्री साडेसात वाजता बेंगळुरूमध्ये आरसीबी आणि एलएसजी यांच्यातील सामना होईल.

3 एप्रिलला एप्रिलला रात्री साडेसात वाजता विशाखापट्टणममध्ये डीसी विरुद्ध केकेआर असा सामना रंगेल.

4 एप्रिलला रात्री साडेसात वाजता अहमदाबादमध्ये जीटी विरुद्ध पीबीकेएस समोरासमोर उभे राहातील.

5 एप्रिलला रात्री साडेसात वाजता हैदराबादमध्ये एसआरएच विरुद्ध सीएसके अशी मॅच होईल.

6 एप्रिलला रात्री साडेसात वाजता जयपूरमध्ये आरआर विरुद्ध आरसीबी अशी मॅच होईल.

7 एप्रिलला दुपारी साडेतीन वाजता मुंबईत एमआय विरुद्ध डीसी तर रात्री साडेसात वाजता लखनऊमध्ये एलएसजी विरुद्ध जीटी असे सामने रंगतील.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2024 : आजपासून आयपीएलच्या रणसंग्रामाला सुरुवात, इथे फ्री मध्ये पाहता येतील सामने, असं आहे संपूर्ण वेळापत्रक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल