राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनला द्यायची ऑफर सीएसकेला दिली आहे, याबदल्यात राजस्थानने सीएसकेचे रवींद्र जडेजा आणि सॅम करन हे दोन खेळाडू मागितले आहेत. सीएसके आणि राजस्थान यांच्यात बोलणी सुरू आहेत, पण दुसरीकडे पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्सकडून पडद्यामागे वेगवान घडामोडी सुरू आहेत. मुंबई इंडियन्सने शेवटची आयपीएल ट्रॉफी 2020 साली जिंकली, यानंतर मागच्या पाच मोसमात त्यांना यश आलेलं नाही. मुंबईला 2020 ला चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूचं मुंबईच्या टीममध्ये कमबॅक होऊ शकतं.
advertisement
राहुल चहरचं कमबॅक होणार?
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार मुंबई इंडियन्स पुढच्या मोसमासाठी त्यांची स्पिन बॉलिंग मजबूत करण्याच्या तयारीत आहे. यासाठी मुंबईची नजर त्यांच्याकडूनच खेळलेल्या दोन जुन्या लेग स्पिनरवर आहे. राहुल चहर हा मागच्या मोसमात सनरायजर्स हैदराबादचा भाग होता, पण आयपीएलच्या मागच्या मोसमात त्याला एकच मॅच खेळण्याची संधी मिळाली होती. मुंबईने अजून सनरायजर्ससोबत चर्चा सुरू केली नसली, तरी राहुल चहरला टीममध्ये घेण्यासाठी मुंबई उत्सुक आहे.
2020 साली मुंबई इंडियन्स शेवटची आयपीएल ट्रॉफी जिंकली, तेव्हा राहुल चहर त्या टीमचा भाग होता. यानंतर तो पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबादच्या टीममध्ये होता. राहुल चहरला हैदराबादने 3.2 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे, त्यामुळे त्याला टीममध्ये घ्यायचं असेल तर मुंबईला 3.2 कोटी रुपये खर्च करावे लागतील, अन्यथा सध्या टीममध्ये असलेला खेळाडू हैदराबादला द्यावा लागेल.
मयंक मार्कंडेवरही नजर
राहुल चहरचं टीममध्ये कमबॅक होऊ शकलं नाही तर सध्या केकेआरकडे असलेला लेग स्पिनर मयंक मार्कंडे याच्यावरही मुंबईची नजर आहे. मयंक मार्कंडे देखील याआधी मुंबईकडून खेळला आहे. मयंकसाठी मुंबई कॅश डील करू इच्छिते, तसंच यासाठी ते केकेआरकडे लवकरच प्रस्तावही पाठवू शकतात. केकेआरने मयंकला 30 लाख रुपयांमध्ये खरेदी केलं होतं, त्यामुळे मुंबईसाठी ही डील सोपी ठरू शकते. मयंकने 2018 साली मुंबई इंडियन्सकडूनच आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं.
अर्जुनच्या बदल्यात ठाकूर
दुसरीकडे क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यातही ट्रेड डीलच्या चर्चा सुरू आहेत. अर्जुन तेंडुलकरला देऊन मुंबई इंडियन्स शार्दुल ठाकूरला टीममध्ये आणण्यासाठी इच्छुक असल्याचं या वृत्तात सांगण्यात आलं आहे.
