अनिरुद्ध रविचंदर यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर लिहिले आहे, 'लग्न? हाहा... शांत राहा यार, कृपया अफवा पसरवणे थांबवा.' रविचंदर याने डेटिंगबद्दल काहीही सांगितले नाही. जरी दोघे सध्या लग्न करत नसले तरी दोघेही निश्चितच एकमेकांना डेट करत आहेत, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार 34 वर्षीय अनिरुद्धने सुमारे वर्षभरापूर्वी 32 वर्षांच्या काव्याशी डेट करायला सुरुवात केली. यानंतर त्यांच्या लग्नाची तयारीही सुरू असल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
काव्या अनिरुद्ध लवकरच लग्न करणार?
रेडिटवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, 'संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सन टीव्हीच्या कलानिधी मारन यांची मुलगी आणि सनरायझर्स हैदराबाद आयपीएल संघाची मालकीण काव्या मारन हे रिलेशनशिपमध्ये असण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, सुपरस्टार रजनीकांत कलानिधी मारन यांच्याशी त्यांच्या नात्याबद्दल वैयक्तिकरित्या बोलले आहेत, त्यामुळे हे जोडपे लवकरच लग्न करू शकतात.'
अनिरुद्ध आणि काव्या एकत्र डिनर डेटवर
अनिरुद्ध आणि काव्या अलिकडेच डिनरसाठी एकत्र दिसले, तेव्हापासून या चर्चा सुरू झाल्या. या दोघांना बरेच ठिकाणी एकत्र पाहिलं गेलं आहे, असा दावाही रेडिट यूज करणाऱ्यांनी केला आहे.
अनिरुद्ध कलाकारांच्या कुटुंबातील
अनिरुद्ध कलाकारांच्या कुटुंबातील आहे. तो अभिनेता रवी राघवेंद्र आणि शास्त्रीय नृत्यांगना लक्ष्मी यांचा मुलगा आहे. त्यांच्या मावशी लता यांचे लग्न ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांच्याशी झाले आहे आणि त्यांचे पणजोबा के सुब्रमण्यम हे 1930 च्या दशकात चित्रपट निर्माते होते. अनिरुद्ध याने रजनीकांत, कमल हासन, थलापती विजय, अजित, सूर्या, पवन कल्याण, महेश बाबू आणि ज्युनियर एनटीआर यांसारख्या दक्षिणेतील दिग्गजांसाठी संगीत दिले आहे. शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
सन ग्रुपचे अध्यक्ष कलानिधी मारन यांची 33 वर्षीय मुलगी काव्या अनेकदा क्रिकेटच्या मैदानात दिसते. आयपीएल सामन्यांमध्ये दिसणारी काव्या उत्साहाने तिच्या टीमला पाठिंबा देते. आनंद साजरा करताना किंवा निराशा व्यक्त करताना तिच्या अॅनिमेटेड प्रतिक्रिया अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात.