TRENDING:

दिवसाला 40 अंडी अन् किलोभर चिकनचा खुराक, पोलीस कॉन्सटेबलचा अमेरिकेत धमाका!

Last Updated:

जालन्यातील कन्हैयानगर सारख्या झोपडपट्टी परिसरात राहणारे डांगे मागील 16 वर्षांपासून शरीरसौष्ठव करत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना, 3 डिसेंबर: आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही छंद असतात. मात्र छंद केवळ छंदापुरतेच न ठेवता त्यांना व्यावसायिक रूप दिले तर आपण आपल्या देशाची मान उंचावू शकतो. जालन्यातील प्रसिद्ध बॉडी बिल्डर किशोर डांगे यांनी हेच दाखवून दिले आहे. नुकत्याच लॅटिन अमेरिका येथे झालेल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत त्यांनी रौप्य पदकाची कमाई केलीय. त्यामुळे डांगे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
advertisement

कन्हैयानगर सारख्या झोपडपट्टी एरिया मध्ये राहणारे डांगे मागील 16 वर्षांपासून शरीरसौष्ठव करत आहेत. पोलीस दलातील नोकरी सांभाळून त्यांनी आपला छंद जोपासला आहे. या छंदा मधून त्यांना विविध संधी मिळत गेल्या आणि त्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सिल्वर, गोल्ड आणि ब्रॉझ अशी विविध पदके मिळवली आहेत. नुकत्याच लॅटिन अमेरिका येथे झालेल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत त्यांनी सिल्वर मेडल तर पावर लिफ्टिंग प्रकारात ब्रांझ मेडल मिळवले. त्यांच्या या कामगिरीने भारावून गेलेल्या कन्हैया नगरवासीयांनी त्यांचं जंगी स्वागत केलंय.

advertisement

शेतकरी कन्येची मोठी भरारी, शिक्षणासाठी आलंय जपानचं बोलावणं, Video

महाराष्ट्र पोलिसांत कार्यरत

View More

महाराष्ट्र पोलीस मध्ये जालना जिल्ह्यामध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे. 17 ते 25 नोव्हेंबर दरम्यान अमेरिका देशांमधील खेळाडूंसाठी मेक्सिको येथे स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धांमध्ये विविध खेळ खेळले गेले. भारताचे प्रतिनिधित्व करताना मी बॉडी बिल्डिंगमध्ये सिल्वर मेडल मिळवला आहे. तर पावर लिफ्टिंग प्रकारामध्ये ब्रांझ मेडल मिळवला आहे. मी मागील तब्बल सोळा वर्षांपासून बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये आहे. एक मूवी पाहून मी बॉडी बिल्डिंग या क्षेत्राकडे वळलो याआधी देखील मी आंतरराष्ट्रीय पातळीवर एक गोड एक सिल्वर आणि एक ब्रांझ मेडल मिळवले आहे. माझं एकच ध्येय आहे की, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव उंच व्हावं आणि त्यासाठी मी सतत प्रयत्नशील असतो असं किशोर डांगे यांनी सांगितले.

advertisement

MBA तरुणाने नोकरी सोडून केली शेती, सेंद्रीय पेरू विक्रीतून लखपती

असा असतो आहार

बॉडी बिल्डिंग करत असताना सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे आहार. मी दिवसाला तब्बल आठ वेळा डायट करतो. यामध्ये दिवसभरात 40 अंडी, एक किलो चिकन, एप्पल, फ्रुट सलाड आणि ग्रीन सलाड अशा प्रकारचा डायट मी घेतो. आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिम मध्ये जाऊन व्यायाम करणे सकाळ दुपार आणि संध्याकाळ असे तीनही वेळेस वर्कआउट करणे गरजेचे असते आपापल्या क्षमतेनुसार एक ते दीड तास वर्कआउट करावे वर्कआउट करताना टेक्निकल बाबी लक्षात घेऊनच वर्कआउट केलं पाहिजे असं किशोर डांगे यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
दिवसाला 40 अंडी अन् किलोभर चिकनचा खुराक, पोलीस कॉन्सटेबलचा अमेरिकेत धमाका!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल