मांजरेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'जेव्हा जो रूट टेस्ट क्रिकेटमध्ये नवी उंची गाठत होता, तेव्हा माझं लक्ष विराट कोहलीकडे जातं. त्याने टेस्ट क्रिकेट सोडून दिलं. निवृत्तीआधी 5 वर्ष विराट टेस्टमध्ये संघर्ष करत होता. टेस्ट क्रिकेटमध्ये या काळात आपली सरासरी 31 एवढी कमी का राहिली? हे जाणून घ्यायचा प्रयत्न विराटने केला नाही', असं मांजरेकर म्हणाले.
advertisement
'विराट आणखी चांगलं करू शकला असता का? याची चर्चा नंतर होऊ शकते. पण जो रूट, स्टीव्ह स्मिथ आणि केन विलियमसन यांच्यासारखे खेळाडू त्यांची वेगळी ओळख तयार करत आहेत, पण विराटने या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली, याचं दु:ख आहे. विराटने तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली असती, तर मला काहीही आक्षेप नसता, पण त्याच्या टेस्ट सोडून वनडे खेळण्याच्या निर्णयामुळे मी जास्त निराश आहे. कारण वनडे फॉरमॅट सर्वोत्तम खेळाडूसाठी सगळ्यात सोपा फॉरमॅट आहे', असं वक्तव्य संजय मांजरेकर यांनी केलं आहे.
वनडे सोपं म्हणून खेळतोय विराट
'बाकीचे तीन खेळाडू टेस्ट क्रिकेटमध्ये रन करत असताना विराट या फॉरमॅटचा भाग नाही. हा त्याचा निर्णय आहे, ही त्याची पसंत आहे, पण जो रूट जेव्हा शतक करतो किंवा रन करतो, स्टीव्ह स्मिथ, केन विलियमसन रन करतो, तेव्हा माझ्या मनात विराटचा विचार होतो आणि मी निराश होतो, कारण विराट टेस्ट क्रिकेटवर इतकं प्रेम करतो', असं संजय मांजरेकर म्हणाले.
