नेमकं काय झालं?
युझवेंद्र चहल कोलकात्याला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा त्याच्या डावातील पहिल्या आणि आठव्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर युजवेंद्र चहलने टाकलेल्या त्याच्या विरोधात एक जोरदार एलबीडब्ल्यू अपील आली. त्यावर अंपायरने त्याला आऊट दिलं. अजिंक्यने रिव्ह्यू घेणे योग्य मानलं नाही. नॉन-स्ट्रायकर अंगक्रिशनेही कर्णधाराला रिव्ह्यू घेण्यास सांगितलं, पण रहाणेने त्याचे ऐकलं नाही आणि तो पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, जेव्हा रहाणे बाहेर केल्यानंतर विकेट चेक केली गेली, तेव्हा बॉल पिचिंग आऊटसाईड असल्याचं दिसून आलं. त्यामुळे हाताने विकेट गमावली.
advertisement
मोहम्मद कैफची टीका
अजिंक्य रहाणेने यावेळी डीआरएस न घेतल्याने अनेकांनी टीका केली. त्यावर माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने पराभवासाठी थेट अजिंक्यला जबाबदार धरलं. त्याचवेळी, कैफने केकेआर कर्णधाराला सल्लाही दिला. 'रहाणे हा संघाचा खेळाडू आहे, सामन्याच्या हाय टाईममध्ये तो स्वार्थी झाला. त्याला हे लक्षात आले पाहिजे की तो केकेआरचा मुख्य फलंदाज आहे, जर थोडीशी शंका असेल तर त्याला डीआरएस घेणे आवश्यक आहे', असं मोहम्मद कैफ म्हणाला आहे.