मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वाचा टप्पा
मुंबई इंडियन्सला या सामन्यात फक्त गोलंदाजांकडून नव्हे तर फलंदाजांकडूनही उत्तम प्रदर्शनाची गरज आहे. सलामीवीर रोहित शर्मा अजूनही लयीत आलेला नाही. तर रेयान रिकेल्टन भारतीय खेळपट्टींवर संघर्ष करत आहे. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या तिलक वर्मा आणि मधल्या फळीवर अतिरिक्त दबाव येत आहे. सूर्यकुमार यादव गुजरात टायटन्सविरुद्ध 48 धावांची चांगली खेळी करून फॉर्ममध्ये परतत असल्याचे संकेत दिले. पण त्याच्याकडून अजूनही मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
advertisement
लाडक्या मुलीच्या शिक्षणासाठी किती fees भरतो धोनी? प्रसिद्ध शाळेत जाते झिवा
हार्दिक पंड्याच्या नंतरच्या फलंदाजीत कोणीही प्रभावी फिनिशर नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या टॉप आणि मिडल ऑर्डर फलंदाजांना स्वच्छंदपणे खेळता येत नाही. कोलकाता नाइट रायडर्सच्या तुलनेत ही मोठी कमतरता आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती मुंबईला मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.
केकेआरचा विजयाचा आत्मविश्वास
केकेआरने मागील हंगामात वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला पराभूत केले होते. हा त्यांचा 12 वर्षांनंतर वानखेडेवरील पहिला विजय होता. त्यामुळे या सामन्यात त्यांचा आत्मविश्वास अधिक असेल. कोलकाता नाइट रायडर्सने आपल्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर राजस्थान रॉयल्सविरुद्ध मोठा विजय मिळवला आणि आता ही विजयी लय कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
डेडली ग्रुप आहे हा...; जा तिकडे, मला एक फोटो काढायचा- रोहित शर्माचा व्हिडिओ
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील केकेआर संघ मजबूत दिसत आहे. मात्र क्विंटन डीकॉकसोबत सलामीसाठी सुनील नरेन फिट नसल्यामुळे राजस्थानविरुद्ध अपेक्षित सुरुवात त्यांना मिळाली नाही. ओपनर म्हणून मोईन अली फार प्रभावी वाटला नाही.
केकेआरची ताकद आणि धोका
केकेआरकडे कर्णधार अजिंक्य रहाणेसह वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी आणि आंद्रे रसेल असे जबरदस्त फलंदाज आहेत. रिंकू सिंग आणि आंद्रे रसेल हे डेथ ओव्हर्समध्ये धडाकेबाज फलंदाजी करण्यास ओळखले जातात. गोलंदाजीत हर्षित राणा आणि वैभव अरोरा, ऑस्ट्रेलियाच्या स्पेन्सर जॉन्सनसोबत नवी चेंडू हाताळतात आणि हे आक्रमण भक्कम मानले जाते. परंतु केकेआरची खरी ताकद त्यांचा फिरकी विभाग आहे, ज्यामध्ये सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती हे दोन प्रमुख गोलंदाज आहेत.
मुंबई इंडियन्सला विजयाची गरज
मुंबई इंडियन्ससाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. जर त्यांनी हा सामना गमावला, तर सलग तीन पराभवामुळे संघावर मोठा दबाव येईल. त्यामुळे हार्दिक पंड्याला आपल्या संघाकडून फलंदाजी आणि गोलंदाजीत सुधारणा करण्याची नितांत गरज आहे. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील ही लढत चुरशीची होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर कोणता संघ वर्चस्व गाजवतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.