पाकिस्तानच्या फिल्डिंगची नेहमी चर्चा होत असते. अशातच आता पाकिस्तान वुमेन्स आणि न्यूझीलंड वुमेन्स यांच्यातील सामन्यात पाकिस्तानचे दोन फिल्डरची जोरदार धडक झाली. सामन्याच्या चौथ्या ओव्हरमध्ये ही घटना घडली आहे. त्यामुळे काही वेळ सामना थांबला देखील होती. नशरा संधू आणि सादिया इक्बाल या दोन फिल्डरची मिड ऑफ आणि कव्हरच्या मधोधम धडक झाली. त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
advertisement
पाहा Video
टीम इंडिया सेमीफायनलमध्ये जाणार?
पाकिस्तानने प्रथम बॉलिंग केली आणि न्यूझीलंडला 110 धावांवर रोखलं. त्यामुळे जर भारताला सेमीफायनलमध्ये जायचं असेल तर न्यूझीलंडने पाकिस्तानला 10.4 ओव्हरच्या आत सामना जिंकण्यापासून रोखलं पाहिजे. जर असं झालं नाही तर पाकिस्तान सेमीफायनलमध्ये जाईल अन् जर पाकिस्तानने 10.4 ओव्हरनंतर विजय मिळवला तर भारत सेमीफायनलमध्ये जाईल.
पाकिस्तान महिला (प्लेइंग इलेव्हन): मुनीबा अली (विकेटकीपर), सिद्रा अमीन, सदफ शमास, निदा दार, ओमामा सोहेल, आलिया रियाझ, फातिमा सना (कर्णधार), इरम जावेद, सय्यदा आरूब शाह, नशरा संधू, सादिया इक्बाल.
न्यूझीलंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास