पाकिस्तानातील यूट्यूब चॅनेल्सवर बंदी
गृह मंत्रालयाच्या शिफारशीनुसार, भारत सरकारने जम्मू-कश्मीरमधील दुर्दैवी पहलगाम दहशतवादी घटनेच्या पार्श्वभूमीवर कारवाई केली आहे. भारत, त्याचे सैन्य आणि सुरक्षा यंत्रणांविरोधात भडकावू, सांप्रदायिक तणाव वाढवणारी, खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्या पाकिस्तानातील काही यूट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. या कारवाईचा उद्देश देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण करणाऱ्या अपप्रचाराला आळा घालणे आहे. बंदी घालण्यात आलेल्या चॅनेलमध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनेलचा देखील समावेश आहे.
advertisement
शोएब अख्तरचा युट्यूब चॅनेल
दिशाभूल करणारी विधाने आणि चुकीची माहिती प्रसारित केल्याबद्दल डॉन न्यूज, समा टीव्ही, आर्य न्यूज, जिओ न्यूजसह 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे. तसेच शोएब अख्तरचा युट्यूब चॅनेलचा देखील दिसेनासा झाला आहे. दिशाभूल करणारे कथन आणि चुकीची माहिती प्रसारित केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.
जम्मू विधानसभेचे विशेष अधिवेशन
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सोमवारी जम्मू विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासोबतच दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. हल्ल्यानंतर केंद्र सरकारने उचललेल्या पावलांच्या समर्थनार्थ एकमताने ठराव मंजूर केला जाऊ शकतो. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे म्हणणे आहे की हे अधिवेशन दहशतवादाविरुद्ध विशेष असेल.