आयसीसीकडे तक्रार करण्याची धमकी
30 सप्टेंबर रोजी एसीसीच्या व्हर्च्युअल बैठकीत बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये शाब्दिक चर्चा झाली, त्यादरम्यान मोहसिनने बीसीसीआयची माफी मागितली, परंतु बीसीसीआय ठाम राहिला. त्यानंतर मोहसीन नक्वी यांनी बीसीसीआयची माफी मागितली. बीसीसीआयने पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना शक्य तितक्या लवकर ट्रॉफी परत करण्यास सांगितले आणि जर त्यांनी तसे केले नाही तर आयसीसीकडे तक्रार करण्याची धमकी दिली होती.
advertisement
एसीसी कार्यालयात येऊन ट्रॉफी घेतली तरच...
बीसीसीआयची माफी मागितल्यानंतर मोहसिन नक्वी यांनी खरे रंग दाखवले. त्यांनी यावेळी एक अट ठेवली. जर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव स्वतः एसीसी कार्यालयात येऊन ट्रॉफी घेतली तर तो ती त्यांना आशिया कपची ट्रॉफी देण्यात येईल, असं नक्वी यांनी सांगितलं. त्यावर बीसीसीआयने नक्वींची मागणी फेटाळून लावली.
मोहसीन नक्वीला जाब विचारला
दरम्यान, आशियाई क्रिकेट कौन्सिलची दुबईत बैठक झाली. या बैठकीसाठी बीसीसीआयकडून राजीव शुक्ला (Rajeev Shukla) आणि आशिष शेलार (Ashish Shelar) ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी राजीव शुक्ला यांच्यासह आशिष शेलार यांनी मोहसीन नक्वीला चांगलाच जाब विचारला. त्यामुळे आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या बैठकीतही जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली होती.