पुणे : कराटे हा तसा मूळचा जपान मधील खेळ. आत्म सुरक्षेचे तंत्र म्हणून याकडे बघितले जाते. सध्या हाच कराटे एक प्रसिद्ध क्रीडा प्रकार म्हणून समोर येताना दिसतोय. हा खेळ अनेक स्तरांवरती खेळला जातो. गावपातळीपासून ते इंटरनॅशनल पातळी पर्यंत मोठ्या प्रमाणात हा खेळ खेळला जातो. याच कराटे खेळासाठी पुण्यातील एका तरूणानं आपलं स्वतःच आयुष्य समर्पित केलं आहे. हा तरुण गोर गरीब मुलांना कराटे शिकवण्याचं काम करत आहे.
advertisement
स्वतःच आयुष्य कराटे खेळाला समर्पित
पुण्यातील दुर्गा माता वसाहत म्हणजेच तळजाई परिसरात राहणाऱ्या या तरूणाचं नाव मोहित सेतिया आहे. या तरुणानं आपलं स्वतःच आयुष्य कराटे या खेळाला समर्पित केलं आहे. मोहितनं आत्तापर्यंत कराटेचे अनेक सामने खेळले आहेत. यात त्याला जिल्हा पातळीपासून ते नॅशनल पर्यंतचे सर्व पुरस्कार मिळालेले आहेत. परंतु नाजूक आर्थिक परिस्थिती मुळे मोहित पुढे खेळू शकला नाही. बेताच्या परिस्थितीमुळे मोहित स्वतः च स्वप्न पूर्ण करू शकला नाही. मात्र आज तो त्याच्यासारख्या अनेक मुलांचे स्वप्न साकार करण्यास मदत करतोय.
रस्त्यावर झोपणाऱ्या गोर गरिबांना मायेची ऊब देणारा ‘ब्लॅंकेट दूत’; 3 वर्षांपासून राबतोय उपक्रम Video
गोर गरीब विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम
मोहितने आजपर्यंत गोर गरीब विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम केले आहे. आर्थिक परिस्थिती अभावी त्याला आपलं स्वप्न पूर्ण करता आलं नाही. मात्र, जे विद्यार्थी या खेळासाठी प्रयत्नशील आहे त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम सध्या मोहित करतोय. वस्तीमध्ये राहणाऱ्या मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांना कराटेमध्ये पारंगत करतोय. मोहितनं आत्तापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना कराटेचे प्रशिक्षण दिलेय.
नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या पी ई एफ आई गेम्स नॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये मोहितच्या विद्यार्थ्यांनी कमालीची कामगिरी केलेली पाहायला मिळाली. मोहितनं या स्पर्धेसाठी अकरा विद्यार्थी तयार केले होते. या विद्यार्थ्यांनी प्राथमिक फेरी जिंकून आपापल्या वयोगटांमध्ये अंतिम फेरीमध्ये देखील सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावले आहे.
जिल्हा परिषद शाळेमध्ये फुलली सुंदर परसबाग; विद्यार्थ्यांना दिले जातायत शेतीचे धडे PHOTOS
वस्ती पातळी वर मुलांना कराटेचं प्रशिक्षण
15 वर्ष झालं मी कराटेचं प्रशिक्षण देत आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय, जिल्हा अशा विविध स्तरावर विद्यार्थांना मी खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. संस्कृत भाषेत ही कराटे ची कला मुलांना शिकवत आहे. माझ्या घरची आर्थिक परिस्थिती यामुळे मला अनेक संकटाना सामोरं जावं लागलं पण अशी वेळ ही कोणा वर येऊ नये यासाठी वस्ती पातळी वर मुलांना कराटेचं प्रशिक्षण देत आहे. या मध्ये दोन प्रकार आहेत एक काथा आणि कोमिते काथा हा कराटेचा आत्मा असतो. तो परफेक्टली टान्स मुंमेंट करतात त्यांना काथा म्हणतात. कोमिते म्हणजे फुल्ल कॉन्टॅक्ट त्याला कोमिते म्हणतात, अशी माहिती कराटेचे प्रशिक्षक मोहित सेतिया यांनी दिली आहे.
पदक जिकंल
आमची नॅशनल स्पर्धा ही दिल्ली येथे झाली. मी त्यासाठी गेले होते. यामध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक मला मिळालं आहे. मी बालाजी नगरहुन पद्मावतीला रोज सरावासाठी येते. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे स्पर्धेला जाण्यासाठी शाळेतील रिक्षावाले यांनी मदत केली. यामुळे मला सुवर्ण पदक मिळालं. शाळेत देखील यामुळे कौतुक झालं अशी माहिती विद्यार्थीनी प्रिया जाधव हिने सांगितली आहे.