विदर्भाने पहिल्या डावात फलंदाजी करताना 379 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना केरळ संघ 342 धावांवर आटोपला आहे. केरळची सुरूवात फारशी चांगली झाली नव्हती.कारण केरळचा सलामीवीर रोहन कुन्नुमल शुन्य धावावर बाद झाला. त्यानंतर मैदानात असलेल्या अक्षय चंद्रन आणि आदित्य सरवटे केरळचा डाव सावरला होता.
रोहन नंतर अक्षय 14 धावांवर आऊट झाला होता. आणि आदित्य सरवटे चांगली फलंदाजी करत होता त्याने अर्धशकतही झळकावलं होत पण 79 धावांवर तो आऊट झाला.त्याच्यानंतर केरळचा कर्णधार सचिन बेबीच अवघ्या 2 धावांनी शतक हुकलं आहे.त्यामुळे तो 98 धावांवर ऑल आऊट झाला आहे.बाकी इतर खेळाडूंना फारशा धावा करता आल्या नाही त्यामुळे केरळचा संघ 342 धावांवर आटोपला.
advertisement
आता विदर्भ संघाने 37 धावांची आघाडी घेतली आहे. आता विदर्भ संघासमोर अजून दोन दिवस आहे. या दिवसात ते केरळ समोर दुसऱ्या डावात किती आव्हान ठेवते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पण सामन्याला फक्त दोनच दिवस उरल्याने कदाचित हा सामना ड्रॉ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे विदर्भ संघ हा सामना जिंकण्याची शक्यता आहे.