TRENDING:

Ranji Trophy : विदर्भाच्या पठ्ठ्याने भेदक गोलंदाजीने मुंबईला केलं गार, अजिंक्य रहाणेचा संघ पराभवाच्या छायेत?

Last Updated:

रणजी ट्रॉफी स्पर्धेत विदर्भ आणि मुंबई या संघात सेमी फायनलचा सामना सूरू आहे. या सामन्यात विदर्भाचा गोलंदाज पार्थ रेखाडेच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबई संघाने अक्षरस गुडघे टेकले आहे. त्यामुळे मुंबईचा पहिला डाव 270 धावांवर ऑल आऊट झाला आहे. त्यामुळे विदर्भाला दुसऱ्या डावात 113 धावांची आघाडी मिळाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Ranji Trophy, Mumbai Vs Vidarbha : रणजी ट्रॉफी स्पर्धेत विदर्भ आणि मुंबई या संघात सेमी फायनलचा सामना सूरू आहे. या सामन्यात विदर्भाचा गोलंदाज पार्थ रेखाडेच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबई संघाने अक्षरस गुडघे टेकले आहे. त्यामुळे मुंबईचा पहिला डाव 270 धावांवर ऑल आऊट झाला आहे. त्यामुळे विदर्भाला दुसऱ्या डावात 113 धावांची आघाडी मिळाली आहे. पार्थ रेखाडे 4 विकेट्स घेतले आहेत, यश ठाकूर, हर्ष दुबे प्रत्येकी 2 आणि दर्शन नलकांडे आणि नचिकेत भूतेने प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.त्यामुळे विदर्भाच्या या धारदार गोलंदाजीने मुंबई पराभवाच्या छात्रेत आहे.
Ranji Trophy, Mumbai Vs Vidarbha
Ranji Trophy, Mumbai Vs Vidarbha
advertisement

मुंबईच्या पहिल्या डावाची सूरूवात चांगली झाली नव्हती.कारण मुंबईचा सलामीवीर आयुश म्हात्रे अवघ्या 9 धावावर बाद झाला होता. आकाश आनंद आणि सिद्धेश लाड मैदानावर होते. दोघांनी मुंबईचा डावाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पण यश ठाकूरच्या बॉलवर सिद्धेश लाड 35 धावावर बाद झाला.

मुंबईचे दोन विकेट पडल्यानंतर मैदानात कर्णधार अजिंक्य रहाणेची एंन्ट्री झाली होती. मात्र अजिंक्य रहाणे देखील फार काळ टीकू शकला नाही. कारण विदर्भाच्या पार्थ रेखाडेने एकाच ओव्हरमध्ये संपूर्ण मॅच पालटली. पार्थ पहिल्यांदा अजिंक्य रहाणेला 18 धावांवर क्लिन बोल्ड केले. त्यानंतर सुर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या दोन्ही खेळाडूना त्याने शुन्यावर बाद केले. त्यामुळे पार्थ एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट घेऊन संपुर्ण मॅच फिरवली.

advertisement

मुंबईचे झटपट तीन विकेट पडल्यानंतर शम्स मुलानीचे देखील लगेच विकेट पडला त्याला हर्ष दुबे एलबीडब्ल्यू आऊट केले. एकीकडे एकाबाजूने मुंबईचे विकेट पडत असताना दुसकीकडे आकाश आनंद एकाबाजूने मुंबईचा डाव सावरून होता. त्यानंतर शार्दुल ठाकूर आणि तनुश कोटीयनने देखील मैदानावर टीचून धावा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते दोघेही 37 आणि 33 धावांवर आऊट झाले होते. त्यानंतर मैदानात उतरलेला मोहित अवस्थी देखील 10 धावांवर परतला.

advertisement

मुंबईची 9 विकेट पडून देखील आकाश आनंद एकाकी झूंज देत होता. त्याने त्याचे शतक देखील पुर्ण केले. त्यानंतर 106 धावांवर तो आऊट झाला आणि मुंबईचा डाव देखील 270 धावांवर आटोपला होता. विदर्भाकडून पार्थ रेखाडे 4 विकेट्स घेतले आहेत, यश ठाकूर, हर्ष दुबे प्रत्येकी 2 आणि दर्शन नलकांडे आणि नचिकेत भूतेने प्रत्येकी एक विकेट घेतली आहे.

advertisement

दरम्यान पहिली बॅटींग करताना विदर्भने पहिल्या डावात 383 धावा ठोकल्या होत्या. या धावांचा पाठलांग करताना मुंबई 270 धावांवर ऑल आऊट झाली आहे.त्यामुळे आता विदर्भाला 113 धावांची आघाडी मिळाली आहे. सध्या विदर्भाच्या दुसऱ्या डावाला सूरवात झाली आहे. आता दुसऱ्या डावात विदर्भ किती धावा करते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पण सध्या विदर्भाच्या उत्कृष्ट खेळीमुळे मुंबईवर पराभवाचं सावट आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ranji Trophy : विदर्भाच्या पठ्ठ्याने भेदक गोलंदाजीने मुंबईला केलं गार, अजिंक्य रहाणेचा संघ पराभवाच्या छायेत?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल