नेमकं काय झालं?
दुसऱ्या डावात 28 धावांची लीड घेऊन टीम इंडिया मैदानात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी टी ब्रेकपर्यंत किविंच्या 26 धावा झाल्या होत्या. न्यूझीलंडला गुंडाळण्यासाठी रोहितने एका बाजूने अश्विनचा मारा सुरू ठेवला. त्याचवेळी, सुंदरने दुसऱ्या एन्डने कोनवेला बाद केलं. आर अश्विनने मैदानात आलेल्या रचिन रविंद्रला फिरकीच्या जाळ्यात अडकवलं अन् ऋषभने उर्वरित काम फत्ते केलं. ऋषभने स्पीडने बॉल पकडला आणि बेल्स उडवल्या. त्याचा विडिओ आता समोर आला आहे.
advertisement
पाहा Video
दरम्यान, भारताचा पहिला डाव 263 धावांवर संपला. न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 235 धावा केल्या होत्या. त्यामुळे पहिल्या डावानंतर टीम इंडियाला 28 धावांची आघाडी मिळाली. भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 90 धावा केल्या. शनिवारी भारताने 4 गड्यांच्या मोबदल्यात 86 धावांवर खेळ सुरू केला आणि उर्वरित 6 विकेट गमावून टीम इंडियाने 177 धावा केल्या. शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी टीम इंडियाचा डाव पुढे नेला आणि आक्रमक फलंदाजी केली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडियाला लाज राखता आली.
टीम इंडिया (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (WK), सरफराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टॉम लॅथम (C), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (WK), ग्लेन फिलिप्स, इश सोढी, मॅट हेन्री, एजाज पटेल, विल्यम ओरोर्के.