बीसीसीआयचा नियम काय?
विद्यमान अध्यक्ष रॉजर बिन्नी जुलैमध्ये 70 वर्षांचे होतील. बीसीसीआयच्या नियमांनुसार, कोणत्याही अधिकाऱ्याला वयाच्या 70 व्या वर्षानंतर पद सोडावे लागते. वृत्तानुसार, राजीव शुक्ला काही महिन्यांसाठी पदभार सांभाळतील. नवीन अध्यक्ष निवड होईपर्यंत ते कार्यवाहक अध्यक्ष म्हणून काम पाहतील. शुक्ला 2020 पासून बीसीसीआयचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.
advertisement
राजीव शुक्ला नवे कार्यवाहक अध्यक्ष
सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बीसीसीआयच्या पुढील निवडणुकांपर्यंत राजीव शुक्ला या पदावर राहतील, अशी माहिती समोर आली आहे. 2015 मध्ये, बीसीसीआयने त्यांची आयपीएलच्या अध्यक्षपदी एकमताने पुन्हा नियुक्ती केली. 18 डिसेंबर 2020 रोजी, त्यांची बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती.
रॉजर बिन्नी कोण आहेत?
दरम्यान, रॉजर बिन्नी 1983 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य होते. त्या स्पर्धेत त्यांनी सर्वाधिक 18 विकेट्स घेतल्या होत्या. ळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतरही ते क्रिकेटशी जोडलेले राहिले. त्यांनी बीसीसीआयच्या (BCCI) अध्यक्षपदासह विविध पदांवर काम केले. 18 ऑक्टोबर 2022 रोजी ते बीसीसीआयचे 36 वे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले होते. 2000 मध्ये अंडर-19 क्रिकेट विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाचे ते मुख्य प्रशिक्षक होते.