Rohit sharma Pass Fitness Test : आशिया कप सूरू व्हायला अवघे 9 दिवस उरले आहेत.त्याआधीच भारताचा वनडे कर्णधार रोहित शर्माने मोठं मैदान मारलं आहे. रोहित शर्माने सर्वांत कठीण समजली जाणारी 'ब्राँको टेस्ट' पास करून दाखवली आहे. रोहित सोबत इतर 8 खेळाडू देखील या परिक्षेत पास झाले आहेत. विशेष म्हणजे रोहित पास झाल्यामुळे गौतम गंभीरची रणनिती फसल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सूरू आहे.
advertisement
खरं तर आशिया कप सूरू होण्याआधी भारतीय खेळाडूंची बंगळुरूच्या बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये सर्वांत कठीण समजली जाणारी 'ब्राँको टेस्ट' घेतली गेली. या टेस्टसाठी भारताचा वनडे कर्णधार रोहित शर्मा पोहोचला होता. त्याच्यासोबत इतरही खेळाडू या टेस्टसाठी पोहोचले होते. या सर्व खेळाडूंनी आता फिटनेस टेस्ट पास केल्याची माहिती रेव्ह स्पोर्टसने दिली आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरूद्ध खेळताना दिसणार आहे. जर या टेस्टमध्ये रोहित शर्मा नापास झाला असता तर त्याच्यासाठी मोठी अडचण झाली असती.
रोहित सोबत शुभमन गिल, मोहम्मद सिराज, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, यशस्वी जयस्वाल, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर हे देखील बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पोहोचले होते. त्यामुळे या खेळाडूंनी देखील ही फिटनेस टेस्ट पास केली आहे.
खरं तर गौतम गंभीरने भारताची सुत्रे हातात घेतल्यापासून अनेक बदल करायला सूरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्याने खेळाडूच्या फिटनेसवर विशेष लक्ष देण्यासाठी 'ब्राँको टेस्ट' नावाची नवीन टेस्ट आणली होती. याआधी खेळाडूंची यो यो टेस्ट घेतली जायची. पण गंभीरच्या कारकिर्दीत ही नवीन टेस्ट उदयास आली. विशेष म्हणजे ही टेस्ट गंभीरने त्यावेळेस सूरू केली, ज्यावेळेस रोहित शर्मा आणि विराट कोहली सारखे खेळाडू क्रिकेटपासून अनेक महिने दूर होते. त्यामुळेच गंभीरला काही खेळाडू फिटनेस टेस्ट पास न व्हावे असेच वाटत होते. पण तसे असून सूद्धा रोहित शर्माने फिटनेस टेस्ट पास केली आहे.
कशी होते 'ब्राँको टेस्ट'
बीसीसीआयने अलीकडेच एक ‘ब्राँको टेस्ट’ सुरू केली आहे. यात खेळाडूंना 20 मीटर, 40 मीटर आणि 60 मीटर अशा शटल रनिंग कराव्या लागतात. असे एकूण 5 सेट करावे लागतात. खेळाडूंना 6 मिनिटांत 1200 मीटर अंतर पूर्ण करावे लागते आणि या सेट्सदरम्यान त्यांना कोणतीही विश्रांती मिळत नाही. यासोबत खेळाडूंची DEXA स्कॅन होणार असून यात हाडांची तपासणी केली जाते. यासोबतच रक्त तपासणीही केली जाते.