Rohit Sharma VIDEO : येत्या 11 जानेवारी 2026 पासून न्यूझीलंड मालिकेला सूरूवात होणार आहे. या मालिकेसाठी रोहित शर्माने मैदानात कसून सराव करायला सूरूवात केली आहे. या सरावा दरम्यान रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्माचे प्रॅक्टीस सेशन सोडून भलतच काही तरी चाललं आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या या व्हिडिओची चर्चा रंगली आहे. दरम्यान या व्हिडिओत नेमकं काय आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
खरं तर रोहित शर्मा सध्या मुंबईच्या मैदानात न्यूझीलंड विरूद्ध मालिकेसाठी मैदानात सराव करतोय. या सरावा दरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा सोबत फोटो काढण्यासाठी पोरींची नुसती लाईन लागली आहे. यामध्ये पहिल्यांदा तीन मुली रोहित सोबत फोटो काढायसा येतात. त्यानंतर पोरींचा एक घोळकाच फोटो काढायला येतो. पण रोहित या फॅन्सना अजिबात नाराज करत नाहीत. त्यानंतर काही पुरूष खेळाडू देखील फोटो काढायला येतात.
Rohit Sharma clicking pictures with Mumbai women’s team players during his practice session.📸❤️ pic.twitter.com/W6oPgqv8le
—
