रोहित सर्वांचा हळवा कोपरा - दिनेश लाड
रोहित शर्मा निवृत्तीचा विषय नेहमी समोर येतो. कालही मला काहीजणांनी विचारलं की, रोहित शर्मा निवृत्ती घेणार का? कारण तो नेहमीच सर्वांचा हळवा कोपरा आहे. मला तर वाटत नाही त्याने निवृत्ती घ्यावी, असं दिनेश लाड म्हणाले आहेत.
... म्हणून T20 मधून निवृत्ती घेतली - दिनेश लाड
advertisement
रोहित शर्माने टी-ट्वेंटी निवृत्तीच यासाठी घेतली होती की पुढे त्याला खेळायचं आहे. रोहित शर्माला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप जिंकायची होती. पण आपल्याला क्वालिफाय करता आलं नाही. रोहित संघात असताना 2019 मध्ये टीम इंडियाला वनडे वर्ल्ड कप जिंकता आला नाही. तर 2023 मध्ये आपण फायनलमध्ये पोहोचलो असताना जिंकलो नाही. त्यामुळे रोहित शर्माची मानसिक इच्छा आहे की, त्याला ते जिंकायचंय, असं दिनेश लाड म्हणाले.
रोहितला 2027 चा वर्ल्ड कप जिंकायचाय - दिनेश लाड
रोहितने याच कारणामुळे टी-ट्वेंटीमधून निवृत्ती घेतली. टी-ट्वेंटी फास्ट क्रिकेट आहे. तसेच यंगस्टर्सला संधी मिळाली, असं वाटत असतं. त्यामुळे त्याने त्या फॉरमॅटपासून बाजुला होण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माला 2027 चा वर्ल्ड कप खेळायचाय आणि तो वर्ल्ड कप जिंकून त्याला निवृत्ती घेयचीये, असं दिनेश लाड यांनी न्यूज 18 लोकमतच्या पॉडकास्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या विजयानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली आणि रविंद्र जडेजा या तीन दिग्ग्जांनी निवृत्ती जाहीर केली होती. त्यावेळी सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. अशातच आता चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर देखील तिघं निवृत्ती घेतील, अशी शक्यता होती. मात्र, आता ही शंका दूर झाली आहे.