ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्माची कॅप्टन्सी काढून घेण्यात आली आहे. रोहितऐवजी शुभमन गिलला भारताच्या वनडे टीमचा कर्णधार करण्यात आलं आहे. गिलला कर्णधार केल्यामुळे रोहित आणि विराट 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळणार का? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
रोहित मान्य करणार आगरकरची अट
भारतीय टीम फार वनडे क्रिकेट खेळत नसल्यामुळे तसंच रोहित टी-20 आणि टेस्टमधून निवृत्त झालेला असल्यामुळे त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये सहभागी व्हावं, अशी निवड समिती प्रमुख अजित आगरकरची इच्छा होती. भारतामध्ये नुकत्याच झालेल्या इंडिया ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए मधल्या वनडे सीरिजमध्ये रोहित शर्मा खेळेल, अशी शक्यताही वर्तवली गेली होती, पण रोहित या सीरिजमध्ये खेळला नाही. पण आता रोहित अजित आगरकरची अट मान्य करणार असल्याची शक्यता आहे.
advertisement
रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळण्याची शक्यता आहे. 24 डिसेंबरपासून विजय हजारे ट्रॉफीला सुरूवात होत आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये एकूण 6 राऊंडच्या मॅच होणार आहेत, यातल्या कमीत कमी 3 राऊंडमध्ये रोहित शर्मा सहभागी होऊ शकतो, असं वृत्त समोर आलं आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर रोहित शर्मा भारतीय चाहत्यांना विजय हजारे ट्रॉफी खेळताना दिसू शकतो.