टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रोहित दोन ते तीन दिवस बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे फिटनेस टेस्ट देईल, ज्यात ब्रॉन्को टेस्टसह अनेक चाचण्यांचा समावेश असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वनडे सीरिजआधी रोहितला त्याचा फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे. बंगळुरूमध्ये असताना रोहित सराव सत्रांमध्येही सहभागी होण्याची शक्यता आहे.
'रोहित शर्मा 13 सप्टेंबरपासून बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स येथ फिटनेस टेस्टसाठी येणार आहे. इथे तो दोन ते तीन दिवस राहिल. नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या वनडे सीरिजसाठीदेखील रोहित सराव करेल', अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.
advertisement
'11 ते 15 सप्टेंबर दरम्यान सेंटर ऑफ एक्सलन्सच्या मुख्य मैदानात दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामनाही होणार आहे. त्याचवेळी रोहितची फिटनेस टेस्ट घेतली जाईल, तसंच वेगळ्या मैदानात रोहित सराव करेल', असं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे.
रोहित इंडिया ए कडून खेळणार?
रोहित शर्मा आणि विराट कोहली 30 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी इंडिया ए कडून खेळण्याची शक्यता आहे. हे तिन्ही सामने कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. 19 ऑक्टोबरपासून टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये वनडे सीरिज खेळणार आहे, या सीरिजच्या तयारीसाठी विराट आणि रोहित इंडिया ए कडून खेळू शकतात.
रोहित शर्मा हा सध्या टीम इंडियाचा माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर याच्याकडून मुंबईमध्ये सराव करत आहे. रोहित आणि विराट यांनी टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याआधी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, तर मागच्या वर्षी दोघंही आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्त झाले, त्यामुळे हे दोन्ही खेळाडू आता फक्त वनडे क्रिकेट खेळणार आहेत.