गोव्यामध्ये सारा तेंडुलकरसोबत दिसणारा हा मुलगा तेंडुलकर कुटुंबासोबत अनेक फोटोंमध्ये दिसला आहे. या मुलाचे सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांच्यासोबतचे फोटोही आहेत. तसंच तो आयपीएलमध्ये सारा तेंडुलकरसोबत काही सामन्यांमध्येही दिसला होता.
कोण आहे सिद्धार्थ?
सारा तेंडुलकरसोबत दिसणाऱ्या या मुलाचं नाव सिद्धार्थ केरकर आहे. सिद्धार्थ केरकर हा कलाकार असून सारा त्याला इन्स्टाग्रामवरही फॉलो करते. सिद्धार्थचे सोशल मीडियावर 90 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सिद्धार्थ केरकर हा गोव्यामध्ये राहतो. सिद्धार्थच्या प्रोफाइलमध्ये सारा तेंडुलकरसोबतचे त्याचे अनेक फोटो आहेत. त्यातलाच एक फोटो आयपीएल दरम्यान वानखेडे स्टेडियममधील आहे. याचसोबत त्याने गोव्यात सचिन आणि अंजली तेंडुलकरसोबतचे फोटोही शेअर केले आहे.
advertisement
सिद्धार्थ केरकर हा गोव्यामधील एका रेस्टॉरंटचा सह-मालक असल्याचंही बोललं जातं. सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि सारा तेंडुलकर यांच्या नात्याबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
साराचा नवीन व्यवसाय
सारा तेंडुलकरने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर साराचे 86 लाख फॉलोअर्स आहेत. ऑस्ट्रेलियाने पर्यटनाला चालना देण्याची जबाबदारीही सारावर दिली आहे. तसंच साराने आता नवीन व्यवसायही सुरू केला आहे. साराने मुंबईमध्ये पिलेट्स स्टुडिओ उघडला आहे. या स्टुडिओच्या माध्यमातून साराने तिची आवड असलेल्या फिटनेसचं व्यवसायामध्ये रुपांतर केलं आहे.