शूटमधील फोटो व्हायरल
साहिबजादा फरहानने अलिकडेच झालेल्या प्रमोशनल शूट दरम्यान पुन्हा असंच काही करून वाद पुन्हा निर्माण केला. शूटमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर आता सोशल मीडियावर फरहानवर जोरदार टीका होत आहे आणि भारतीय चाहत्यांनी त्याला फटकारलं आहे. मात्र, पाकिस्तानला खोड अजून मोडली नाही, हे या निमित्ताने स्पष्ट झालं आहे.
advertisement
पाकिस्तानी खेळाडू भारतासमोर ढिल्ले
साहिबजादा फरहान हा एकमेव खेळाडू होता, ज्याने भारताविरुद्ध टक्कर देण्याचा प्रयत्न केला. बाकी पाकिस्तानी खेळाडू भारतासमोर ढिल्ले दिसले होते. साहिबजादा फरहान याने आक्रमक फलंदाजी करत प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताच्या फिरकीसमोर त्याचं काहीही चाललं नव्हतं.
हॅरीस रौफला देखील दंड
दरम्यान, आशिया कपमध्ये फरहानसोबत हॅरीस रौफने देखील मैदानात वादग्रस्त अॅक्शन केली होती. या अॅक्शन नंतर आयसीसीने रौफला मॅच फीच्या 30 टक्के दंड ठोठावला होता. त्यासोबत एक डिमेरीट पॉइंटही दिला होता.