TRENDING:

Shreyas Iyer : आशिया कपच्या तोंडावर श्रेयस अय्यरला लॉटरी,थेट कर्णधारपदाची माळ गळ्यात, BCCIने दिली मोठी जबाबदारी

Last Updated:

येत्या 9 सप्टेंबरपासुन आशिया कपला सूरूवात होणार आहे. या स्पर्धेला अवघे दोन दिवस उरले असताना श्रेयस अय्यरवर बीसीसीआयने मोठी जबाबदारी सोपवली आहे. श्रेयसच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Shreyas Iyer News : येत्या 9 सप्टेंबरपासुन आशिया कपला सूरूवात होणार आहे. या स्पर्धेला अवघे दोन दिवस उरले असताना श्रेयस अय्यरवर बीसीसीआयने मोठी जबाबदारी सोपवली आहे. श्रेयसच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली आहे. खरं तर श्रेयस अय्यरला आशिया कप संघात स्थान मिळालं नव्हतं. त्यामुळे त्याच्यावर अन्याय झाल्याची भावना चाहत्यांकडून व्यक्त होत होती. पण बीसीसीआयने श्रेयसच्या खांद्यावर ही जबाबदारी देऊन नाराजी दूर केली आहे.त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
shreyas iyer captain
shreyas iyer captain
advertisement

येत्या काही दिवसात ऑस्ट्रेलिया अ संघ मल्टी डे सामन्याच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआकडून भारताच्या अ संघांची घोषणा करण्यात आली आहे. या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरच्या खांद्यावर दिली आहे. तर उप कर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे सोपवली गेली आहे.

श्रेयस अय्यरने कोलकत्ता नाईट रायडर्स संघाला जेतेपद मिळवून दिलं होतं. तसेच मागच्या आयपीएल हंगामात देखील त्याने पंजाब किंग्ज संघाला अंतिम फेरीत पोहोचवलं होतं. या हंगामान त्याने उत्कृष्ट फलंदाजी आणि नेतृत्व देखील केले होतं. ही गोष्ट पाहून त्याच्यावर आता मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

advertisement

भारताला ऑस्ट्रेलिया विरूद्ध दोन मल्टी डे सामने खेळायचं आहेत.या दोन्ही सामन्याचे श्रेयस अय्यर करणार आहे. या सामन्यांना 16 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. या सामन्यासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.यासह दुसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरसोबत केएल राहुल आणि मोहम्मद सिराज देखील खेळणार आहेत.

भारत-अ संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, नारायण जगदीसन (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (उप-कर्णधार/यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, हर्ष दुबे, आयुष बडोनी, कृष्णा बडोनी, तनिश कुमार रेड्डी, नितिश कुमार, कृष्णा रेड्डी. ब्रार, खलील अहमद, मानव सुथार, यश ठाकूर.

advertisement

ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत-अ वेळापत्रक

पहिला 4 दिवसांचा सामना: 16 ते 19 सप्टेंबर, लखनऊ

दुसरा 4 दिवसांचा सामना: 23 ते 26 सप्टेंबर, लखनऊ

पहिला एकदिवसीय सामना: 30 सप्टेंबर, कानपूर

दुसरा एकदिवसीय सामना: 3 ऑक्टोबर, कानपूर

तिसरा एकदिवसीय सामना: 5 ऑक्टोबर, कानपूर

श्रेयस अय्यर अलिकडच्या काळात भारतीय संघासाठी फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसला आहे. श्रेयसने फेब्रुवारी 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध भारतीय संघासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्याच वेळी, त्याचा शेवटचा टी20 आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर 2023 मध्ये बेंगळुरू येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shreyas Iyer : आशिया कपच्या तोंडावर श्रेयस अय्यरला लॉटरी,थेट कर्णधारपदाची माळ गळ्यात, BCCIने दिली मोठी जबाबदारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल