TRENDING:

Shubhman Gill : गंभीरच्या डोक्यात बेझबॉलचं खुळ! पण शुभमनला शहाणपण सुचलं, टेस्ट क्रिकेटसाठी BCCI कडे केली मोठी मागणी

Last Updated:

Shubhman Gill suggested BCCI Over Test Cricket : प्रत्येक कसोटी सिरीज सुरू होण्यापूर्वी टीम इंडियासाठी किमान 15 दिवसांचे विशेष तयारी शिबीर आयोजित करावे, अशी मागणी शुभमन गिलने बीसीसीआयकडे केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Shubhman Gill suggested Test Cricket Plan : भारतीय टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सध्या सुरू आहे. रोहित शर्माने कॅप्टन्सी सोडल्यानंतर नव्या तरुणांसह मैदानात उतरलेल्या टीम इंडियाची कामगिरी सुमार राहिली आहे. अशातच आता गौतम गंभीरला प्रशिक्षणपदावरून हटवावं, अशी मागणी केली जात असताना शुभमनला एक शहाणपण सुचलं आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, शुभमन गिलने बीसीसीआयला एक महत्त्वाचा प्रस्ताव दिला आहे.
Shubhman Gill suggested BCCI Over Test Cricket
Shubhman Gill suggested BCCI Over Test Cricket
advertisement

शुभमन गिलची बीसीसीआयकडे मागणी

प्रत्येक कसोटी सिरीज सुरू होण्यापूर्वी टीम इंडियासाठी किमान 15 दिवसांचे विशेष तयारी शिबीर आयोजित करावे, अशी मागणी शुभमन गिलने बीसीसीआयकडे केली आहे. शुभमन गिलने आपल्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्धची कसोटी सिरीज 2-2 ने बरोबरीत सोडवली होती, तर वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवला होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सिरीजमध्ये भारताला 2-0 ने पराभव स्वीकारावा लागला, ज्यामुळे गिलने तयारीवर अधिक भर देण्याची गरज व्यक्त केली आहे.

advertisement

15 दिवसांच्या कॅम्पची मागणी

भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त असल्याने गिलची 15 दिवसांच्या कॅम्पची मागणी पूर्ण करणे बीसीसीआयसमोर मोठे आव्हान असणार आहे. उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सिरीज संपल्यानंतर अवघ्या 4 दिवसांतच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सिरीज सुरू झाली होती. अशा परिस्थितीत सरावासाठी पुरेसा वेळ मिळणे कठीण होते. त्यामुळे माईंडसेट तयार व्हावा आणि सरावाला वेळ मिळाला यासाठी शिबिर आवश्यक असल्याचं शुभमनने म्हटलं आहे.

advertisement

व्हीव्हीएस लक्ष्मणला प्रमोशन मिळणार?

जेव्हा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर व्हाईट बॉल क्रिकेटच्या कामात व्यस्त असतील, तेव्हा बीसीसीआय 'सेंटर ऑफ एक्सलन्स'चे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांची मदत घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता गंभीरला टेस्ट क्रिकेटपासून लांब केलं जातंय का? असा प्रश्न देखील उपस्थित होतोय.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनचे दर वाढले, कापूस आणि तुरीला आज काय मिळाला भाव? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

दरम्यान, भारतीय संघाला जुलै 2026 पर्यंत एकही कसोटी मॅच खेळायची नाही, ज्यामुळे बोर्डाला या नियोजनावर विचार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. या विश्रांतीनंतर गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया श्रीलंका विरुद्ध 2 कसोटी सामन्यांची सिरीज खेळणार असून त्यानंतर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे महत्त्वाचे सामने होणार आहेत. या नियोजनामुळे भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा मार्ग सापडू शकतो.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shubhman Gill : गंभीरच्या डोक्यात बेझबॉलचं खुळ! पण शुभमनला शहाणपण सुचलं, टेस्ट क्रिकेटसाठी BCCI कडे केली मोठी मागणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल