TRENDING:

महिला क्रिकेटची नवी 'डॉन'; स्मृती मंधानाचा झंझावाती World Record, एकाच दिवशी तीन विक्रम तुटले, क्रिकेटविश्व थक्क

Last Updated:

Smriti Mandhana: विशाखापट्टणममध्ये सुरू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला वर्ल्ड कप सामन्यात स्मृती मंधानाने एकाच दिवशी तीन ऐतिहासिक विक्रमांची नोंद केली. 5000 धावांचा टप्पा, 1000 धावा एका वर्षात आणि प्रतीका रावलसोबत विक्रमी भागीदारी करून तिनं क्रिकेटविश्व थक्क केलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

विशाखापट्टणम: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 मध्ये आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत सुरू आहे. भारताची ही स्पर्धेतील चौथी मॅच आहे. विशाखापट्टणम येथील एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियमवरील लढतीत टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

advertisement

भारताची सलामीची जोडी स्मृती मंधाना आणि प्रतीका रावल या दोघींनी संघाला अप्रतिम आणि दमदार सुरुवात करून दिली. दोघींनी पॉवरप्लेच्या काळात काही आकर्षक फटके खेळले आणि वेगाने धावा केल्या. पॉवरप्ले संपेपर्यंत भारताचा एकही विकेट गेलेला नव्हता आणि संघाने 58 धावा केल्या होत्या. त्यानंतर या दोघींनी शतकी आणि मग दीडशतकी भागिदारी केली. स्मृतीने आजच्या डावात 66 चेंडूत 80 धावा केल्या. यात 3 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता. तिने पहिल्या विकेटसाठी प्रतीकासोबत 155 धावांची भागिदारी केली.

advertisement

या दरम्यान स्मृती मंधानाने एक ऐतिहासिक विक्रम केला. तिने या वर्षात (2025 मध्ये) महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये 1000 धावांचा टप्पा पार केला. अशा प्रकारे ती महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात एका कॅलेंडर वर्षात 1000 धावा करणारी पहिली महिला फलंदाज ठरली आहे.

यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधार बेलिंडा क्लार्क यांच्या नावावर होता. बेलिंडा क्लार्क यांनी 1997 मध्ये वूमेन्स ओडीआयमध्ये 80.83 च्या सरासरीने 970 धावा केल्या होत्या. स्मृतीने त्यांचा विक्रम मागे टाकत नवा इतिहास रचला आहे.

advertisement

स्मृती मंधाना आणि प्रतीका रावल यांनी या सामन्यात आपल्या भागीदारीने आणखी एक विशेष नोंद केली आहे. वूमेन्स ओडीआय क्रिकेटमध्ये या जोडीने आता 14 वेळा 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आहे. यामुळे स्मृती-प्रतीका जोडी आता भारतासाठी सर्वाधिक “फिफ्टी प्लस पार्टनरशिपकरणाऱ्या जोड्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. या जोडीनं माजी खेळाडू अंजुम चोप्रा आणि मिताली राज यांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. अंजुम-मिताली जोडीने महिला ओडीआयमध्ये 13 वेळा 50 किंवा त्याहून जास्त भागीदाऱ्या केल्या होत्या.

महिला वनडे मध्ये सर्वाधिक 50+ भागीदाऱ्या (भारतीय खेळाडू)

हरमनप्रीत कौर आणि मिताली राज – 18 (56 डाव)

स्मृती मंधाना आणि प्रतीका रावल – 14 (21 डाव)*

अंजुम चोप्रा आणि मिताली राज – 13 (57 डाव)

मिताली राज आणि पूनम राऊत – 13 (34 डाव)

स्मृती मंधाना आणि प्रतीका रावलचा आणखी एक विक्रम!

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक 100 धावांच्या भागीदाऱ्या (कोणत्याही विकेटसाठी):

5 बेलिंडा क्लार्क आणि लिसा केटल्ली (ऑस्ट्रेलिया महिला, 2000)

4 सूझी बेट्स आणि रॅचेल प्रीस्ट (न्यूझीलंड महिला, 2015)

4 स्मृती मंधाना आणि प्रतीका रावल (भारत महिला, 2025)*स्मृती मंधानाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये दहाव्यांदा 50+ स्कोअर केला आहे. ती या बाबतीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारी भारतीय फलंदाज ठरली आहे. तिने मिताली राजच्या नऊ वेळा 50+ स्कोअर्सचा विक्रम मोडला आहे.

स्मृती मंधानाचे आणखी एक मैलाचे दगड

स्मृती मंधानाने महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये 5000 धावांचा टप्पा पार केला आहे. ती या यशापर्यंत पोहोचणारी पाचवी महिला फलंदाज आणि दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. इतकेच नाही तर पाच हजारचा टप्पा पार करणारी ती सर्वांत तरुण आणि सर्वांत वेगवान खेळाडू ठरली आहे. तिने हा विक्रम 112 डाव आणि 5569 चेंडूंमध्ये केला आहे. या बाबतीत स्मृतीने स्टेफनी टेलर (129 डाव) आणि सूझी बेट्स (6182 चेंडू) या दोघींना मागे टाकले आहे.

भारतासाठी महिला ODमध्ये सर्वाधिक 100 धावांच्या भागीदाऱ्या (कोणत्याही विकेटसाठी):

7 मिताली राज आणि पूनम राऊत (34 डाव)

6 स्मृती मंधाना आणि प्रतीका रावल (21 डाव)

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, आजही भाव वाढ नाहीच, कारण काय?
सर्व पहा

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
महिला क्रिकेटची नवी 'डॉन'; स्मृती मंधानाचा झंझावाती World Record, एकाच दिवशी तीन विक्रम तुटले, क्रिकेटविश्व थक्क
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल