नदीन डी क्लर्क मॅच जिंकवूनच गेली
भारताने दिलेल्या 252 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या टीमची सुरुवात खराब झाली होती, त्यांची स्थिती 5 विकेट्स गमावून 81 रन्स अशी झाली होती. मात्र, त्यानंतर कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट (70 रन्स) आणि क्लो ट्रायॉन (49 रन्स) यांनी टीमचा डाव सावरला. सामन्याचा खरी हिरो ठरली नदीन डी क्लर्क... तिने 54 बॉलमध्ये 8 फोर आणि 5 सिक्स मारत नाबाद 84 रन्सची अविश्वसनीय मॅच विनिंग खेळी करत 48.5 ओव्हरमध्येच टीमला विजय मिळवून दिला. नदीन डी क्लर्कने विकेट न गमावता एका बाजूने आक्रमक फलंदाजी सुरू ठेवली. अखेरच्या 12 बॉलमध्ये 12 धावांची गरज होती. तेव्हा देखील नदीन डी क्लर्क डगमगली नाही अन् मॅच जिंकवूनच गेली.
advertisement
दक्षिण आफ्रिकेचा भारतावर सलग तिसरा विजय
भारताकडून क्रांती गौड आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, पण त्या विजयासाठी पुरेशा नव्हत्या. नदीन डी क्लर्क ला तिच्या जबरदस्त बॅटिंगसाठी 'प्लेअर ऑफ द मॅच' (Player of the Match) पुरस्कार देण्यात आला. दक्षिण आफ्रिका वुमेन्सस संघाने हा सामना 3 विकेट्सने जिंकत वर्ल्ड कपमध्ये भारतावर सलग तिसरा विजय मिळवला.
रिचा घोषची आक्रमक फलंदाजी
दरम्यान, यापूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 49.5 ओव्हरमध्ये 251 रन्स केले. भारताकडून विकेटकीपर बॅटर रिचा घोष हिने शानदार खेळ दाखवला. तिने 77 बॉलमध्ये 11 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 94 रन्सची उत्कृष्ट खेळी केली. ती शतक हुकली. शेवटी स्नेह राणा हिने 24 बॉलमध्ये 33 रन्सची जलद खेळी करत टीमला 250 चा टप्पा ओलांडून दिला. दक्षिण आफ्रिकेसाठी क्लो ट्रायॉन हिने 3, तर नॉनकुलुलेको मलाबा, नदीन डी क्लर्क आणि मारिजाने कॅप यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.