जेव्हा भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी त्याला थेट लग्नाबद्दल प्रश्न विचारला. च संपल्यानंतर कुलदीप यादव वाहिनीसोबत बोलत असताना, सुनील गावस्कर यांनी त्याला एक मजेशीर प्रश्न विचारला.
advertisement
तु लग्न कधी करणार आहेस? असा प्रश्न गावस्कर यांनी विचारला. तेव्हा कुलदीप यादव आधी लाजला आणि नंतर हसून म्हणाला, "पुढच्या वर्षी होईल." मात्र, त्याने पुढच्या वर्षी नेमक्या कोणत्या महिन्यात लग्न करणार, याची माहिती दिली नाही.
यापूर्वी, 4 जूनला लखनऊमध्ये आयोजित एका समारंभात कुलदीपने त्याची बालपणीची मैत्रीण वंशिका हिच्याशी साखरपुडा केली होती. आयपीएल उशिरा संपल्यामुळे 29 जून रोजी होणारे लग्नाचे कार्यक्रम पुढे ढकलावे लागले होते.
कसोटी क्रिकेट सिरीज सुरू असताना, कुलदीपने लग्नाच्या सुट्टीसाठी बीसीसीआयकडे (BCCI) पत्रही लिहिले होते, अशी चर्चा होती. मात्र, कसोटी सिरीजनंतर तो वनडे सिरीजमध्ये व्यस्त झाला.
आता त्याला 9 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या साउथ आफ्रिकेविरुद्धच्या टी20I सिरीजसाठी टीम इंडियामध्ये निवडण्यात आले आहे. त्यामुळे आता तो टी-ट्वेंटी मालिकेनंतर लग्न करेल, अशी चर्चा आहे.
