Egg Prices : ग्राहकांच्या खिश्याला कात्री, ऐन थंडीत अंड्याच्या दरात वाढ, कारण काय?

Last Updated:

थंडीच्या दिवसांत अंड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ग्राहकांकडून इंग्लिश तसेच गावरान अंड्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे.

+
अंडी 

अंडी 

पुणे : हिवाळ्याची चाहूल लागताच बाजारातील अंड्यांचे दर पुन्हा एकदा तेजीत असून पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी मागणी वाढू लागली आहे. थंडीच्या दिवसांत अंड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ग्राहकांकडून इंग्लिश तसेच गावरान अंड्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे. मात्र वाढत्या मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा पडत असल्याने व्यापाऱ्यांनी पुढील दोन महिने दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
सध्या बाजारात गावरान अंडे 12 ते 13 रुपये प्रती नग तर इंग्लिश अंडे 7.50 ते 8 रुपये प्रती नग या दराने विक्री होत आहेत. शेकड्याच्या हिशेबाने पाहता गावरान अंड्यांचा दर 1020 रुपये आणि इंग्लिश अंड्यांचा दर 715 ते 720 रुपये इतका आहे. मागील महिन्याच्या तुलनेत दोन्ही प्रकारच्या अंड्यांना लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.
advertisement
व्यापाऱ्यांच्या मते, थंडी वाढली की लोक अंडी जास्त प्रमाणात खायला सुरुवात करतात. जिमला जाणारे तरुण इतर वेळी तीन ते चार अंडी खात असले, तरी हिवाळ्यात प्रथिनांची गरज भागवण्यासाठी दररोज सहा ते आठ अंडी सेवन करतात. यामुळे शहरी भागात मागणी अधिक वाढते. दुसरीकडे, थंडीच्या दिवसांत कोंबड्यांकडून अंड्यांचे उत्पादन कमी होते. उत्पादन घट आणि मागणी वाढ या दुहेरी परिणामामुळे दर उसळी घेत आहेत.
advertisement
पुणे शहरात दररोज साधारणतः एक कोटी ते सव्वा कोटी अंड्यांची गरज भासते. पिंपरी-चिंचवडसह विस्तृत उपनगर क्षेत्रात आणखी जवळपास 50 ते 70 लाख अंड्यांची मागणी असते. या आवश्यकतेसाठी प्रामुख्याने तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथून अंड्यांची मोठ्या प्रमाणावर आवक होते. मात्र यावर्षी देशभरात मागणी वाढल्याने हैद्राबाद, विजयवाडा आणि मैसूर येथून येणारा पुरवठा घटला आहे. राज्यांतर्गत पाहता, सांगली-मिरज येथून येणाऱ्या अंड्यांची आवक कायम असली तरी ती वाढलेल्या खपापुढे अपुरी पडत आहे.
advertisement
अंड्यांचे व्यापारी लहू किरीट यांनी सांगितले की, दर सध्या 710 ते 720 रुपयांच्या आसपास आहेत. थंडी अजून वाढणार असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील महिन्यात शेकड्याचा दर 720 ते 730 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
दर वाढले असले तरी अंड्यांच्या खपात मात्र घट झालेली दिसत नाही. प्रथिनयुक्त आहार म्हणून अंड्यांची लोकप्रियता कायम असल्याने आणि थंडीच्या दिवसांत शरीराला ऊर्जा आणि उष्णता मिळावी यासाठी अनेकजण दररोजच्या आहारात अंड्यांचा समावेश वाढवत आहेत. विशेषतः गावरान अंड्यांना अधिक पसंती मिळत असून त्यांच्या किमतीत झपाट्याने वाढ होत आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Egg Prices : ग्राहकांच्या खिश्याला कात्री, ऐन थंडीत अंड्याच्या दरात वाढ, कारण काय?
Next Article
advertisement
Nanded Crime : बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत...'
बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत
  • बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत

  • बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत

  • बॉयफ्रेंडच्या मृतदेहाशी लग्न केलं, आंचलने सांगितलं थेट सांगितलं कारण, 'सक्षमसोबत

View All
advertisement