विशाखापट्टणम: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप भारतीय क्रिकेट संघाचा सलग दुसरा पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात 330 धावा करून देखील टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला. या पराभवामुळे गुणतक्त्यात मोठा उलटफेर झाला आहे. ऑस्ट्रेलियाने विजयाचे लक्ष्य 6 चेंडू आणि 3 विकेट राखून पार केले.
advertisement
भारताविरूद्धच्या विजयानंतर ऑस्ट्रेलिया संघाने गुणतक्त्यात अव्वल स्थानी बाजी मारली आहे. त्यांचे 4 सामन्यात 3 विजयासह 7 गुण अव्वल स्थानी झेप घेतली असून त्यांचे नेट रनरेट 1.35 इतके आहे. दुसऱ्या स्थानी इंग्लंडचा संघ असून त्यांचे 6 गुण आणि नेट रनरेट 1.86 इतके आहे. तिसऱ्या स्थानी टीम इंडिया असून भारताचे 4 सामन्यात 2 विजय आणि 2 पराभवासह 4 गुण झाले आहेत. भारताचे नेट रनरेट ०.67 इतके आहे.
चौथ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा संघ असून त्याचे 3 सामन्यात 2 विजय आणि एका पराभवासह 4 गुण आहे. त्यांचे नेट रनरेट वजा 0.88 इतके आहे.
ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक संघाला 7 सामने खेळायचे आहेत. आणि अव्वल 4 संघांना बाद फेरीत प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे भारताला नॉकआऊट फेरीत पोहोचण्यासाठी शिल्लक 3 सामन्यात विजय मिळवणे गरजेचे असेल.
संघ (टीम) | सामने (Mat) | विजय (Won) | पराभव (Lost) | बरोबरी (Tied) | निकाल नाही (NR) | गुण (Pts) | नेट रन रेट (NRR) |
---|---|---|---|---|---|---|---|
ऑस्ट्रेलिया | 4 | 3 | 0 | 0 | 1 | 7 | +1.353 |
इंग्लंड | 3 | 3 | 0 | 0 | 0 | 6 | +1.864 |
भारत | 4 | 2 | 2 | 0 | 0 | 4 | +0.677 |
दक्षिण आफ्रिका | 3 | 2 | 1 | 0 | 0 | 4 | -0.888 |
न्यूझीलंड | 3 | 1 | 2 | 0 | 0 | 2 | -0.245 |
बांगलादेश | 3 | 1 | 2 | 0 | 0 | 2 | -0.357 |
श्रीलंका | 3 | 0 | 2 | 0 | 1 | 1 | -1.515 |
पाकिस्तान | 3 | 0 | 3 | 0 | 0 | 0 | -1.887 |
भारताच्या पुढील लढती
19 ऑक्टोबर- विरुद्ध इंग्लंड
23 ऑक्टोबर- विरुद्ध न्यूझीलंड
26 ऑक्टोबर- विरुद्ध बांग्लादेश