सीनियर खेळाडूंकडून वैभवचं रॅगिंग
वैभव सूर्यवंशीच्या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत युद्धवीर सिंह चरक दिसत आहे. तर दुसरा खेळाडू हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. या व्हिडिओमध्ये युद्धवीर वयावरून वैभवला चिडवत आहे. आमच्या दोघांमध्ये तुला मोठा कोण वाटतो? असा प्रश्न युद्धवीरने विचारला, तेव्हा व्हिडिओ बनवणाऱ्या खेळाडूने वैभव मोठा वाटत असल्याचं उत्तर दिलं. यानंतर तिघेही हसायला लागतात, तर वैभवने नो कमेंट्स सांगून उत्तर देणं टाळलं.
advertisement
युद्धवीर सिंग या व्हिडिओमध्ये वैभव सूर्यवंशीच्या केसांवरही कमेंट करतो. केसाला जेल लावलं आहे, असं युद्धवीर म्हणाल्यावर वैभव मां कसम जेल नहीं लगाया है, असं उत्तर देतो. यानंतर मुंडा कतर चला, असं म्हणून टीम इंडियाच्या आणखी एका खेळाडूने वैभवचं रॅगिंग केलं. वैभव सूर्यवंशीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भारत-पाकिस्तानचा सामना
रायजिंग स्टार आशिया कपमध्ये इंडिया ए ला ओमान, युएई आणि पाकिस्तानसोबत ग्रुप बी मध्ये ठेवण्यात आलं आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना युएईविरुद्ध होणार आहे, तर 16 नोव्हेंबरला भारत-पाकिस्तानचा सामना होईल. 18 नोव्हेंबरला भारत-ओमान यांच्यात मॅच होईल. यानंतर दोन्ही सेमी फायनल 21 नोव्हेंबरला होणार आहेत, तर 23 नोव्हेंबरला फायनल खेळवली जाईल.
इंडिया ए टीम
जितेश शर्मा (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, नेहल वढेरा, प्रियांश आर्या, आशुतोष शर्मा, नमन धीर, सूर्यांश शेडगे, रमनदीप सिंग, युद्धवीर सिंह चरक, यश ठाकुर, गुरजनप्रीत सिंग, विजय कुमार व्यशक, हर्ष दुबे, अभिषेक पोरेल, सुयश शर्मा
