advertisement

मक्याचे दर गडगडले, कांद्या आणि सोयाबीनची आज काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर

Last Updated:

राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.

+
Krushi

Krushi Market

मुंबई: गुरुवार, दिनांक 13 नोव्हेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये सोयाबीन, कांदा आणि मक्याची आवक आणि भाव पाहू.
मक्याचे दर गडगडले 
राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 53 हजार 684 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 9 हजार 527 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास मक्याच्या प्रतीनुसार कमीत कमी 1317 ते जास्तीत जास्त 2001 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 16 क्विंटल मक्यास 2106 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
कांद्याची उच्चांकी आवक मात्र भाव दबावातच 
राज्याच्या मार्केटमध्ये आज 1 लाख, 93 हजार 581 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 1 लाख, 214 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 341 ते जास्तीत जास्त 1888 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 702 क्विंटल कांद्यास 200 ते 3300 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
सोयाबीनची आवक 
राज्याच्या मार्केटमध्ये 67 हजार 170 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी जालना मार्केटमध्ये सर्वाधिक 3 हजार 046 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3988 ते 5455 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच यवतमाळ मार्केटमध्ये आवक झालेल्या 2381 क्विंटल पिवळ्या सोयाबीनला प्रतीनुसार 4885 ते 5018 प्रमाणे बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
मक्याचे दर गडगडले, कांद्या आणि सोयाबीनची आज काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement