TRENDING:

Vaibhav Suryavanshi : सुरू होताच लागला टेस्टचा रिझल्ट, वैभव सूर्यवंशीच्या टीमने इतिहास घडवला, जन्माआधीचा विक्रम तुटला!

Last Updated:

भारताच्या अंडर 19 टीमने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात हरवून इतिहास घडवला आहे. भारतीय युवा टीमने दोन सामन्यांची यूथ टेस्ट सीरिज 2-0 ने जिंकली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारताच्या अंडर 19 टीमने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात हरवून इतिहास घडवला आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात खेळलेल्या भारतीय युवा टीमने दोन सामन्यांची यूथ टेस्ट सीरिज 2-0 ने जिंकली आहे. या सीरिजच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा फक्त 886 बॉलमध्ये विजय झाला आहे, म्हणजेच टीम इंडियाने हा सामना दीड दिवसामध्येच जिंकला आहे. याचसोबत भारताने 30 वर्षांचा विक्रमही मोडला आहे. सर्वात कमी बॉलमध्ये युथ टेस्ट जिंकण्याचा विक्रम आता टीम इंडियाच्या नावावर झाला आहे.
सुरू होताच लागला टेस्टचा रिझल्ट, वैभव सूर्यवंशीच्या टीमने इतिहास घडवला, जन्माआधीचा विक्रम तुटला!
सुरू होताच लागला टेस्टचा रिझल्ट, वैभव सूर्यवंशीच्या टीमने इतिहास घडवला, जन्माआधीचा विक्रम तुटला!
advertisement

वैभव सूर्यवंशीचा धमाका

वैभव सूर्यवंशीने या सीरिजमध्ये धमाकेदार कामगिरी केली. दोन टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये वैभवने 133 रन केल्या, ज्यात एका शतकाचा समावेश होता. वैभवच्या या खेळीमुळे टीम इंडियाला मजबूत सुरूवात मिळाली, जी विजयासाठी महत्त्वाची ठरली. कर्णधार आयुष म्हात्रेची रणनीती आणि भारताच्या घातक बॉलिंगसमोर ऑस्ट्रेलियन टीमने गुडघे टेकले.

वनडे-टेस्टमध्ये कांगारूंची धुलाई

advertisement

टीम इंडियाने फक्त टेस्टच नाही तर वनडे सीरिजमध्येही ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. 3 मॅचची युथ वनडे सीरिज भारताने 3-0 ने जिंकली. सीरिजचा पहिला सामना भारताने 7 विकेटने, त्यानंतर दुसरा सामना 51 रननी आणि तिसरा सामना 167 रननी जिंकला. यानंतर टेस्ट सीरिजमध्येही भारताचं वर्चस्व कायम राहिले. टीमने पहिली युथ टेस्ट इनिंग आणि 58 रननी तर दुसरी टेस्ट 7 विकेट्सनी जिंकली.

advertisement

ऑस्ट्रेलियाची बॅटिंग कोलमडली

दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाची बॅटिंग पूर्णपणे कोलमडली. पहिल्या इनिंगमध्ये त्यांचा फक्त 135 रनवर ऑलआऊट झाला, ज्यात विकेटकीपर ऍलेक्स ली यंगने 66 रन केल्या होत्या. यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांचा 116 रनवर ऑलआऊट झाला, ज्यामुळे भारताला विजयासाठी फक्त 81 रनची गरज होती. भारताने हे आव्हान 3 विकेट गमावून पार केलं.

advertisement

1995 चा विक्रम मोडला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पान सेंटरने पालटलं नशीब, महिन्याला अडीच लाख उलाढाल, सांगितला यशाचा फॉर्म्युला
सर्व पहा

या विजयासह भारताने वेस्ट इंडिजचा 1995 सालचा विक्रम मोडला आहे. वेस्ट इंडिजने फैसलाबादमध्ये पाकिस्तानचा 992 बॉलमध्ये पराभव केला होता. भारताने आता फक्त 886 बॉलमध्ये युथ टेस्ट जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : सुरू होताच लागला टेस्टचा रिझल्ट, वैभव सूर्यवंशीच्या टीमने इतिहास घडवला, जन्माआधीचा विक्रम तुटला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल