TRENDING:

Vaibhav Suryavanshi : क्रिकेटचा हिरो कबड्डीत झिरो, खेळाडूंनी अवघ्या मिनिटात केलं टॅकल, पाहा VIDEO

Last Updated:

भारताचा 14 वर्षीय क्रिकेटपटू वैभव सुर्यवंशी आज कबड्डीच्या ग्रॅड ओपनिंग सेरेमनीला पोहोचला होता.यावेळी त्याने कबड्डीच्या मैदानावर चौकार षटकार लगावले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Vaibhav Suryavanshi Pro kabbadi league 2025 : भारताचा 14 वर्षीय क्रिकेटपटू वैभव सुर्यवंशी आज कबड्डीच्या ग्रॅड ओपनिंग सेरेमनीला पोहोचला होता.यावेळी त्याने कबड्डीच्या मैदानावर चौकार षटकार लगावले होते.आपलं क्षेत्र असल्याने त्याने उत्कृष्ट खेळी केली. पण कबड्डी खेळताना मात्र तो अपयशी ठरला.कारण कबड्डीपटूंनी त्याला अवघ्या काही मिनिटात बाद केले.या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
vaibhav suryvanshi pro kabbadi league 2025
vaibhav suryvanshi pro kabbadi league 2025
advertisement

प्रो कबड्डी लीगच्या 12 व्या सीझनला आज शुक्रवार 29 ऑगस्टपासून सूरूवात झाली आहे.राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त या लीगचे भव्य उद्घाटन झाले.प्रो कबड्डी लीगच्या 12 च्या उद्घाटन समारंभाला क्रीडा जगतातील अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या.त्यांच्यासोबत भविष्यात भारताचे भविष्य बनणारे खेळाडूही सहभागी झाले होते. हॉकी दिग्गज धनराज पिल्लई आणि प्रसिद्ध बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद हे देखील या समारंभात सहभागी झाले होते.तसेच टीम इंडियाचा स्टार खेळाडू वैभव सुर्यवंशी देखील या प्रसंगी उपस्थित होता.

advertisement

advertisement

यावेळी या उद्घाटन सोहळ्यात वैभव सूर्यवंशी खेळाडूंसोबत क्रिकेट खेळताना दिसला.कबड्डी खेळाडूंनी वैभवला बॉलिंग केली तेव्हा त्या बॉलवर चौकार आणि षटकार मारले होते. पण क्रिकेटनंतर ज्यावेळेस वैभवने खेळाडूंसोबत कबड्डी खेळली तेव्हा तो त्याची रेड पूर्ण करू शकला नाही आणि त्याच्या क्षेत्रात परतण्यापूर्वीच त्याला पकडण्यात आले.त्यामुळे वैभवच्या फलंदाजीचा आणि कबड्डी रेडचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

advertisement

दरम्यान आयपीएल 2025 मध्ये वैभव सूर्यवंशीची बॅट खूप चांगली तळपली होती. वैभव सूर्यवंशीने 7 सामन्यात 36 च्या सरासरीने 252 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सच्या या खेळाडूने 35 चेंडूत शतक ठोकून षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला होता. तसेच आयपीएलनंतर वैभवने इंग्लंड दौऱ्यावर अंडर-१९ संघासाठीही चमकदार कामगिरी केली.आता हा खेळाडू क्रिकेट मैदानानंतर कबड्डी खेळण्यासाठी उतरला होता.प्रो कबड्डी लीग (PKL12) च्या 12 व्या हंगामात वैभव सूर्यवंशीला विशेष आमंत्रण मिळाले त्यामुळे तो उपस्थित होता.

advertisement

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा वैभव सूर्यवंशी म्हणाला, राष्ट्रीय क्रीडा दिन मला आठवण करून देतो की खेळ सर्वांना कसे एकत्र आणतो. खेळणे तुम्हाला टीमवर्क, शिस्त आणि लवचिकता शिकवते. राजस्थान रॉयल्सचा भाग असल्याने, शिकत असल्याचे आणि माझी स्वप्ने पूर्ण केल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. मला आशा आहे की माझ्यासारखे आणखी मुले खेळायला सुरुवात करतील आणि स्वतःवर विश्वास ठेवतील.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : क्रिकेटचा हिरो कबड्डीत झिरो, खेळाडूंनी अवघ्या मिनिटात केलं टॅकल, पाहा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल