निवृत्ती गेली खड्ड्यात... किंग खेळणार!
निवृत्ती गेली खड्ड्यात असा इशारा देत विराट कोहलीने निवृत्तीच्या चर्चांनावर फुल स्टॉप लावला आहे. आयपीएल सुरू असताना विराट कोहली एका कार्यक्रमात पोहोचला होता. त्यावेळी विराट कोहली याने बोलताना असं काही म्हटला की विराट कोहलीचे चाहते खुश झाले. विराटने यावेळी आपण 2027 चा वर्ल्ड कप खेळणार असल्याचं जाहीर केलं. त्याचा 15 सेकंदाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
विराट नेमकं काय म्हणाला?
advertisement
तु़झं पुढचं पाऊल काय असेल? असा सवाल प्रश्नोत्तराच्या फेरीत विराट कोहलीला विचारण्यात आला. त्यावेळी 'पुढची स्टेप माझी काय असेल? मला माहिती नाही, पण कदाचित पुढचा वर्ल्ड कप असेल', असं उत्तर विराट कोहलीने यावेळी दिलं. विराटच्या उत्तरानंतर चाहत्यांनी टाळ्या वाजवत त्याच्या निर्णयाचं स्वागत केलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 01, 2025 2:07 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 च्या सुरूवातीलाच Virat Kohli ची मोठी घोषणा, निवृत्तीची चर्चा सुरू असताना दिला 'जोर का झटका'