या निर्णयामुळे बीसीसीआय 9 सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणाऱ्या आशिया कपपूर्वी नवीन स्पॉन्सर शोधत आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, दोन कंपन्यांनी भारतीय क्रिकेट टीमचे टायटल स्पॉन्सर बनण्यास रस दाखवला आहे. टोयोटा मोटर कॉर्पोरेशन आणि एका फिनटेक स्टार्ट-अपने आतापर्यंत रस दाखवला आहे. पण, अधिकृत निविदा प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही, असं या वृत्तात सांगण्यात आलं आहे.
advertisement
आशिया कपसाठी टीम इंडियाची जर्सी आधीच छापण्यात आली होती, ज्यावर ड्रीम11 चे नाव होते, पण आता ही जर्सी आशिया कपसाठी वापरली जाणार नाही. दुसरीकडे बीसीसीआय देशाच्या कायद्याचं पालन करेल, असं बोर्डाचे सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट केलं आहे. 'जर परवानगी नसेल तर आम्ही काहीही करणार नाही. बीसीसीआय केंद्र सरकारने आखलेल्या देशाच्या प्रत्येक धोरणाचे पालन करेल', असे सैकिया म्हणाले.
द इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, ड्रीम11 च्या अधिकाऱ्यांनी बीसीसीआयचे सीईओ हेमांग अमीन यांची मुंबई येथील कार्यालयात भेट घेतली आणि स्पॉन्सरशीपमधून माघार घेत असल्याचं कळवलं.
'ड्रीम11 चे प्रतिनिधी बीसीसीआय कार्यालयामध्ये आले आणि त्यांनी सीईओ हेमांग अमीन यांना कळवले की ते पुढे जाऊ शकणार नाहीत, परिणामी, ते आशिया कपसाठी टीमचे प्रायोजक राहणार नाहीत. बीसीसीआय लवकरच एक नवीन निविदा जारी करेल,' असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.
यूएईमध्ये होणार आशिया कप
आशिया कप 9 सप्टेंबर रोजी सुरू होत आहे, तर स्पर्धेची फायनल 28 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे. आशिया कपच्या सर्व मॅच दुबई आणि अबू धाबीमध्ये होणार आहेत.