रिचा घोषचं शतक 6 रननी हुकलं असलं तरीही तिने भारताला कठीण परिस्थितीतून पुन्हा एकदा बाहेर काढलं आहे. शेवटच्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर मोठा शॉट खेळण्याचा रिचा घोषने प्रयत्न केला, पण यात ती कॅच देऊन बसली. रिचा शर्माशिवाय प्रतिका रावलने 37 आणि स्नेह राणाने 33 रनची खेळी केली आहे. तर स्मृती मंधाना पुन्हा एकदा मोठा स्कोअर करण्यात अपयशी ठरली. 23 रनवरच स्मृती पॅव्हेलियनमध्ये परतली. कर्णधार हरमनप्रीत कौरलाही फक्त 9 रनच करता आले. टीम इंडियाने शेवटच्या 9 ओव्हरमध्ये तब्बल 97 रन केल्या, यातल्या बहुतेक रन या रिचा घोषच्या बॅटमधून आल्या आहेत.
advertisement
दक्षिण आफ्रिकेकडून च्लोई ट्रायनने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर मरिझेन कॅप, नदिने डे क्लार्क आणि मलाबा यांना प्रत्येकी 2-2 विकेट घेण्यात यश आलं. तुमी सेखुखुमेलाही एक विकेट मिळाली.
महिला वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमने आतापर्यंत 2 पैकी 2 मॅच जिंकल्या आहेत. यातल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही रुचा घोषने 20 बॉलमध्ये 35 रनची खेळी करून भारताला सन्मानजनक स्कोअरपर्यंत पोहोचवलं होतं. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध विजय झाला आहे. स्पर्धेत सर्व मॅच जिंकलेली भारतीय टीम पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. 3 मॅचपैकी 2 मॅच जिंकलेली आणि एक मॅच पावसामुळे रद्द झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया 5 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तर 2 सामन्यात 2 विजय मिळालेल्या इंग्लंडचा नेट रनरेट भारतापेक्षा चांगला असल्यामुळे इंग्लंडची टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे.