लंचनंतर यशस्वीने स्ट्राईक रेट वाढवला अन्...
सलामीवीर म्हणून आलेल्या यशस्वी जयस्वालने हळूवार सुरूवात केली. केएल राहुलसोबत त्याने 58 धावांची भागेदारी केली. त्यानंतर त्याने साई सुदर्शन याच्यासोबत शतकीय भागेदारी केली. लंचपर्यंत यशस्वीने हळूवार बॅटिंग केली. मात्र, लंचनंतर यशस्वीने स्ट्राईक रेट वाढवला. आक्रमक फलंदाजी करत यशस्वीने अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर त्याने शतक देखील ठोकलं. यशस्वीने या इनिंगमध्ये एकही चुकीचा शॉट मारला नाही.
advertisement
टेस्ट करियरमधील सातवं शतक
यशस्वी जयस्वालने त्याच्या दोन वर्षांच्या छोट्या कारकिर्दीतील सातवं शतक झळकावलं आहे. या खेळीदरम्यान, यशस्वी जयस्वालने अनेक विक्रमही प्रस्थापित केले आहेत. त्याने फक्त 50 सामन्यांमध्ये 3000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या. तसेच यशस्वीने टेस्ट करियरमधील सातवं शतक ठोकलं आहे. यावेळी त्याने एक रेकॉर्ड देखील रचला आहे.
सचिन तेंडूलकरच्या नावावर 11 शतकं
दरम्यान, यशस्वी जयस्वालने 23 वर्षाच्या आत सात शतकं झळकवून रेकॉर्ड रचला आहे. अशी कामगिरी करताना तो दुसरा भारतीय खेळाडू आहे, त्याआधी महान सचिन तेंडूलकरच्या नावावर 11 शतकं ठोकण्याचा रेकॉर्ड आहे. रवी शास्त्री आणि दिलीप वेंगसरकर यांच्या नावावर प्रत्येकी पाच शतक ठोकण्याचा रेकॉर्ड आहे.