तुम्हालाही ‘कॉल डायलर’ फीचरचा लाभ घ्यायचा असेल, तर व्हॉट्सॲपला लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट करा. WABetaInfo या व्हॉट्सॲप फीचरला ट्रॅक करणाऱ्या वेबसाइटने या फीचरचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ॲप स्टोअरवर उपलब्ध असलेल्या iOS 25.1.80 अपडेटसाठी WhatsApp बीटामधील सर्व iOS यूझर्ससाठी हे फीचर आणले जात आहे. डायलरमध्ये फोन नंबर मॅन्युअली टाकण्याची सुविधा कॉल्स टॅब अंतर्गत उपलब्ध झाली आहे.
advertisement
Amazon Prime मेंबर सावधान! देण्यात आलाय हँकिंगचा इशारा, असं रहा सेफ
WhatsApp चे कॉल डायलर फीचर कसे वापरावे
सर्व प्रथम WhatsApp उघडा आणि कॉल्स टॅबवर जा. येथे क्रिएट कॉल किंवा प्लस आयकॉनवर टॅप केल्यानंतर ‘कॉल अ नंबर’चा ऑप्शन दिसेल. त्यावर टॅप करताच व्हॉट्सॲपमध्ये फोन डायलर उघडेल. आता तुम्हाला ज्याला कॉल करायचा आहे त्याचा नंबर डायल करा. नंबर डायल केल्यानंतर, एंटर केलेला नंबर व्हॉट्सॲपवर रजिस्टर्ड आहे की नाही हे WhatsApp तपासेल.