कार कितीही जुनी असली, तरी तिचं इंटीरियर आणि एक्स्टिरियर जर चांगल्या स्थितीत असेल, तर खरेदीदार अधिक पैसे देण्यास तयार होतो. म्हणूनच, बॉडी पेंट आणि इंटीरियर अपग्रेडेशनवर थोडं खर्च केलं, तरी त्याचे फायदे नक्कीच मिळतात.
कार नियमितपणे सर्व्हिस करणे आणि आवश्यक असल्यास पार्ट्स अपडेट करत राहणे यामुळे तिच्या परफॉर्मन्सवर कोणताही वाईट परिणाम होत नाही. याशिवाय, कारच्या सर्व्हिसचा संपूर्ण रेकॉर्ड जपून ठेवा, कारण संभाव्य खरेदीदार त्या आधारे कारची अवस्था समजून घेऊ शकतो आणि तुमच्याशी योग्य किंमतीवर डील करण्याची शक्यता वाढते.
advertisement
एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जशी-जशी कार जुनी होत जाते, तशी तिची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे वेळेत कार विकणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही ती 5 वर्ष वापरली असेल आणि अजूनही विकली नाही, तर लगेच तिची अवस्था सुधारण्यासाठी काही महत्त्वाची कामं करायला हवीत.
तज्ज्ञांच्या मते, जुनी कार विकण्यासाठी योग्य वेळ म्हणजे ती 5 वर्ष वापरल्यानंतरचा काळ. जर तुम्ही यापेक्षा जास्त वेळ कार वापरत राहिला, तर तिची रीसेल व्हॅल्यू घटू लागते आणि चांगला ग्राहक मिळवणं कठीण होऊन बसतं. त्यामुळे जुनी कार विकायची असेल, तर वेळेत निर्णय घेणं आणि तिला चांगलं सांभाळणं फायदेशीर ठरतं.