TRENDING:

मुंबईची गर्दी ठाण्याकडे वळणार, नवी मुंबई-कल्याणच्या वेशीवर BKC पेक्षा मोठं बिझनेस हब, प्लॅन काय?

Last Updated:

Thane Business Hub: मुंबईचा भार आता कमी होणार असून बीकेसीपेक्षा मोठं बिझनेस हब ठाण्यात होत आहे. 1300 एकरांवरील प्लॅनबाबत जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: दररोज ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण परिसरातून लाखो प्रवासी नोकरीसाठी मुंबईच्या दिशेने जातात. पण आता चित्र बदलणार आहे! ठाण्याच्याच परिसरात मुंबईच्या बीकेसीपेक्षा अधिक मोठं आणि आधुनिक बिझनेस हब उभारलं जाणार आहे. बुलेट ट्रेनचं ठाणे स्थानक ज्या भागात बांधलं जात आहे, त्या परिसरात तब्बल 1300 एकर क्षेत्रावर हे नवं व्यवसाय केंद्र विकसित केलं जाणार आहे.
मुंबईची गर्दी ठाण्याकडे वळणार, नवी मुंबई-कल्याणच्या वेशीवर BKC पेक्षा मोठं बिझनेस हब, प्लॅन काय?
मुंबईची गर्दी ठाण्याकडे वळणार, नवी मुंबई-कल्याणच्या वेशीवर BKC पेक्षा मोठं बिझनेस हब, प्लॅन काय?
advertisement

इंटरनॅशनल बिझनेस सिटी म्हणून ओळख

या नव्या बिझनेस हबसाठी ठाणे महापालिकेची नोडल एजन्सी म्हणून निवड करण्यात आली आहे. हा प्रकल्प जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (JICA) च्या सहकार्याने राबवला जाणार असून, मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सपेक्षा (BKC) एक पाऊल पुढे असलेलं हे अत्याधुनिक बिझनेस हब असेल. उच्च दर्जाचं शहरी नियोजन, आधुनिक पायाभूत सुविधा आणि उत्कृष्ट वाहतूक व्यवस्था यामुळे ठाणे जिल्हा लवकरच “इंटरनॅशनल बिझनेस सिटी” म्हणून ओळखला जाणार आहे.

advertisement

Shockig Accident Virar: मध्य खाडीत बोटीला मोठं भगदाड; हळूहळू शिरू लागलं पाणी, प्रवाशांच्या डोळ्यासमोरच घडली थरारक घटना

उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधी

या प्रकल्पामुळे ठाणे परिसरात उद्योग, आयटी पार्क आणि मल्टिनॅशनल कंपन्यांची गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. यातून रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील आणि ठाणे-कल्याण परिसराला आर्थिकदृष्ट्या नवी उंची मिळेल. तज्ज्ञांच्या मते, हे हब केवळ ठाण्याचं नाही तर महाराष्ट्राच्या आर्थिक नकाशावर एक मोठं केंद्रबिंदू ठरेल.

advertisement

कोणत्या भागात उभारला जाणार हब?

ठाणे आणि केडीएमसी हद्दीतील खालील 10 गावांच्या परिसरातील 1300 एकर क्षेत्र या प्रकल्पासाठी निवडण्यात आलं आहे. यामध्ये दातिवली, म्हातार्डी, बेतवडे, आगासन, आयरे, कोपर, भोपर, नांदिवली, पंचानंद आणि काटई गावांचा समावेश आहे. या जमिनींचं भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, ठाणे महापालिकेनं त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जायकाच्या सल्ल्यानुसार हा विकास टप्प्याटप्प्याने राबवला जाणार आहे.

advertisement

वाहतूक नियोजन आणि सुविधा

या नव्या व्यवसाय हबसाठी 13 वेगवेगळ्या वाहतूक नियोजनाच्या उपाययोजना तयार करण्यात आल्या आहेत. निळजे ग्रोथ सेंटर, ऐरोली-काटई मार्ग, आणि कल्याण-तळोजा मेट्रो लाईन या सर्व प्रकल्पांना नव्या हबसोबत जोडण्यात येणार आहे. तसंच, सिडकोच्या खारघर येथील प्रस्तावित कॉर्पोरेट पार्कला सुद्धा या बिझनेस सिटीशी जोडण्याची योजना आहे.

ठाण्याचा बदलता चेहरा

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिताय? शरीराला कसा होतो फायदा? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे ठाणे आधीच विकासाच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. या बिझनेस हबसह ठाणे शहराचं रुपांतर नव्याने नियोजित, आधुनिक आणि रोजगारकेंद्रित शहरात होणार आहे. यामुळे येत्या काही वर्षांत ठाणे-मुंबई परिसरातील रिअल इस्टेट, उद्योग आणि वाहतूक क्षेत्रात मोठी क्रांती घडेल, असं तज्ज्ञांचं मत आहे.

मराठी बातम्या/ठाणे/
मुंबईची गर्दी ठाण्याकडे वळणार, नवी मुंबई-कल्याणच्या वेशीवर BKC पेक्षा मोठं बिझनेस हब, प्लॅन काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल