TRENDING:

कमी खर्चात जास्त नफा; गव्हाचे 'हे' वाण ठरतील सर्वात फायदेशीर, कराल बक्कळ कमाई

कृषी

यंदा मान्सून जोरदार बरसल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु, रब्बी हंगामात मान्सून च्या पाण्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अपेक्षेने रबी पेरणी करू लागले आहेत. पाण्याची उपलब्धता वाढल्याने रब्बी हंगामात गहू पेरणीकडे शेतकऱ्यांचा ओढा आहे. पाहुयात गव्हाच्या कोणत्या उन्नत जाती आहेत ज्या चांगले उत्पादन देऊ शकतात.

Last Updated: November 18, 2025, 15:07 IST
Advertisement

घरोघरी वस्तू विकल्या, नातेवाईकांचे टोमणे ऐकले; गृह उद्योगातून प्रणिता करते 15 लाखांची उलाढाल

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या प्रणिता कुलकर्णी गेल्या 13 वर्षांपासून 'पुष्कर गृह उद्योग' चालवत आहे. प्रत्येक सीझननुसार त्या वेगवेगळे पदार्थ बनवतात आणि विक्री करतात. हिवाळ्यामध्ये डिंकाच्या लाडूसह विविध पदार्थ मिळतात. लग्नसराईमध्ये सर्व पदार्थ तसेच नवरात्रीमध्ये उपवासाचे पदार्थ असे सीझननुसार पदार्थ बनवतात. या व्यवसायाच्या माध्यमातून कुलकर्णी यांची वर्षाला 15 लाख रुपयांपर्यंत उलाढाल होते. तसेच त्यांनी 3 महिलांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला असल्याची माहिती त्यांनी 'लोकल 18' दिली.

Last Updated: November 18, 2025, 17:37 IST

व्यवसायासाठी 4 वर्षांची नोकरी सोडली, सुरू केलं फूड कॉर्नर, महिन्याला 70000 कमाई

Food

मुंबई : अनेक जण नोकरी सोडून व्यवसायला प्रधान्य देत आहेत. चिंचपोकळीतील वैष्णवी देवळेकर हिने चार वर्षांचा नोकरीचा अनुभव घेतल्यानंतर आयुष्यात मोठा निर्णय घेतला. कॉर्पोरेट आणि मेडिकल क्षेत्रात काम करत असताना तिला स्वतःसाठी आणि घरच्यांसाठी वेळ मिळत नव्हता. स्वतःसाठी काहीतरी करायचंय या विचाराने प्रेरित होऊन वैष्णवीने नोकरीचा राजीनामा दिला आणि सुरू केला स्वतःचा व्यवसाय, श्री स्वामी समर्थ फूड कॉर्नर.

Last Updated: November 18, 2025, 17:21 IST
Advertisement

10 गायीपासून केली सुरूवात, दुग्ध व्यवसायानं नशीबचं पालटलं, वर्षाला 90 लाखांची उलाढाल

छत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील कुंबेफळ येथील अनिल शेळके हे दुधापासून तयार होणाऱ्या तूप, दही, श्रीखंड, लस्सी यासह विविध पदार्थांचे स्वतः उत्पादन घेतात. त्यांच्याकडे दूध संकलन केंद्र देखील आहे. शेळके यांनी सन 2020 मध्ये विघ्नहर्ता गोविन या नावाच्या उत्पादनाची निर्मिती केली. तसेच त्यांचे पदार्थ महाराष्ट्रासह परदेशात देखील विक्री केले जातात. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांची वर्षाला जवळपास 80 ते 90 लाख रुपयांची उलाढाल होत असून खर्च वजा करून एकूण निव्वळ कमाई 10 ते 12 लाख रुपये वर्षाकाठी मिळत असल्याचे शेळके यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.

Last Updated: November 18, 2025, 16:28 IST

साडी असो वा ड्रेस, मोबाईल राहील सेफ, मुंबईकर तरुणीची भन्नाट आयडिया, आता फेमस ब्रँड!

मुंबई: आजपर्यंत आपण वेगवेगळ्या स्टाईलच्या पिशव्या, विविध साईजच्या बॅग्स आणि डिझाईनदार हँडबॅग्स किंवा गळ्यात अडकवायच्या स्लिंग बॅग्स पाहिल्या असतील. पण मोबाईलसाठी खास बनवलेली बॅग. तीही बॅग नसून बेल्टच्या रूपात आणि पूर्णपणे सुरक्षित असेल, असं तुम्ही कधी पाहिलं आहे का? हीच अनोखी कल्पना मुंबईकर आकांक्षा दळवीने प्रत्यक्षात आणली आहे

Last Updated: November 18, 2025, 16:44 IST
Advertisement

नोकरीचा राजीनामा दिला, तरुण आता दिवसाला कमवतोय 16 हजार, असं काय केलं?

सांगली: अलिकडे कित्येक तरुण हॉटेल व्यवसाय क्षेत्रामध्ये उतरताना दिसतात. परंतु बक्कळ पैसे दिसणाऱ्या हॉटेल सारख्या क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व तयार करण्यासाठी प्रचंड धाडस आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी लागते. असेच दांडगे धाडस दाखवत पोलीस दलातील नोकरीचा राजीनामा देत सांगलीच्या ग्रामीण भागातील सुरजने हॉटेल व्यवसाय स्वीकारला आहे. पोलीस दलातील नोकरीचा राजीनामा ते यशस्वी हॉटेल व्यावसायिक होण्याचा खडतर प्रवास ऐकूया. जिद्दी हॉटेल व्यावसायिक सुरज वंजारी यांच्याकडून लोकल18ने जाणून घेतला.

Last Updated: November 18, 2025, 15:46 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/कृषी/
कमी खर्चात जास्त नफा; गव्हाचे 'हे' वाण ठरतील सर्वात फायदेशीर, कराल बक्कळ कमाई
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल