
श्वान पालनाचा छंद अनेकांना असतो, पण कुत्रा घरी आणण्यापूर्वी त्याच्या देखभालीचा खर्च जाणून घेणे महत्त्वाचे आहे. लॅब्रेडोर जर्मन शेफर्ड की गोल्डन रिट्रीव्हर? कोणत्या जातीच्या श्वानासाठी आहार, लसीकरण आणि ग्रूमिंगवर सर्वाधिक खर्च येतो? तुमच्या बजेटमध्ये कोणता श्वान फिट बसेल, याची सविस्तर आकडेवारी आणि तुलना या लेखात पहा!
Last Updated: December 08, 2025, 20:27 ISTफिश पॉटमध्ये काही खास मासे असणं अत्यंत शुभ मानलं जातं. या माशांमुळं घरात सुखशांती आणि भरभराट होते. समृद्धी नांदते आणि अगदी आयुष्यच बदलतं, असं मानलं जातं. त्यामुळे काही खास माशांना फिश पॉटमध्ये ठेवण्यासाठी प्रचंड मागणी असते. हे शुभ समजले जाणारे मासे कोणते आहेत? हेच तर आपण जाणून घेणार आहोत.
Last Updated: December 08, 2025, 20:09 ISTपुणे : हिवाळ्याची चाहूल लागताच बाजारातील अंड्यांचे दर पुन्हा एकदा तेजीत असून पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी मागणी वाढू लागली आहे. थंडीच्या दिवसांत अंड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ग्राहकांकडून इंग्लिश तसेच गावरान अंड्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे. मात्र वाढत्या मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा पडत असल्याने व्यापाऱ्यांनी पुढील दोन महिने दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
Last Updated: December 08, 2025, 19:31 ISTसांगली: ऊस हे पश्चिम महाराष्ट्रातील हुकमी पीक समजले जाते. ऊस शेतीच्या चोख नियोजनातून इथले शेतकरी आर्थिक समृद्धीचा गोडवा चाखतात. यापैकीच सांगलीच्या वाळवा तालुक्यातील पोखर्णी गावचे सरपंच विश्वनाथ जाधव यांनी राजकारण आणि शेतीच्या नियोजनाचा योग्य मेळ घालत 30 गुंठे शेतीतून 90 टन ऊसाचे उच्चांकी उत्पादन घेतले आहे.
Last Updated: December 08, 2025, 19:12 ISTपुणे : गेल्या काही वर्षांपासून प्रॉपर्टीच्या वादावरून ज्येष्ठ नागरिकांना त्रास देण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच वयोमानानुसार उद्भवणाऱ्या शारीरिक अडचणी, एकटेपणा, नातेसंबंधांतील दुरावा, मुलांकडून होणारा तिरस्कार अशा प्रसंगांना अनेक ज्येष्ठ नागरिकांना सामोरं जावं लागतं. या सगळ्या अनुभवांमुळे त्यांच्या आयुष्यात एकाकीपणा आणि नैराश्य वाढू लागते. आपल्या अडचणी कोणाला सांगायच्या? हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहतो. याच समस्या दूर करण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत एक हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत 10 कोटी वृद्ध नागरिकांनी यावरती तक्रार केली आहे. तर 2025 मध्ये महाराष्ट्रातील 4 लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळाला आहे.
Last Updated: December 08, 2025, 18:09 IST