अमरावती : ओला हरभरा मार्केटमध्ये आला की त्यापासून नवनवीन पदार्थ गृहिणी बनवत असतात. आमटी, हुरडा, सोले वांगे आणि विशेष म्हणजे ओल्या हरभऱ्याची चटणी. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारी ही चटणी अतिशय टेस्टी लागते. दररोजच्या जेवणात तुम्ही ही चटणी खाऊ शकता. झणझणीत अशी ओल्या हरभऱ्याची चटणी कशी बनवायची? ही रेसिपी अमरावतीमधील गृहिणी सारिका पापडकर यांनी दिली आहे.