अमरावती: अनेक लोकांना गोड पदार्थ खायला आवडतात. गोड पदार्थ म्हटलं की, नेहमी पेढा आणि इतर गोड पदार्थ समोर येतात. पण, हिवाळ्यात अनेक फळ भाज्या बाजारात येतात. त्यातील गाजर हे अतिशय पौष्टीक आणि आरोग्यदायी मानली जातात. गाजरापासून तुम्ही गाजर बर्फी बनवू शकता. अतिशय टेस्टी अशी कमीत कमी साखर वापरून तयार होणारी गाजर बर्फी कोणालाही आवडेल अशीच असते. हीच गाजराची बर्फी बनवण्याची रेसिपी अमरावती येथील गृहिणी सुनिता घुलक्षे यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितली आहे.